धरमशाला - आगामी विश्वकरंडक स्पर्धेचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन टीम इंडिया आज टी-२०च्या पर्वाला सुरुवात करणार आहे. आफ्रिकेविरुद्ध तीन टी-२० सामन्यांपैकी आज पहिला सामना धरमशाला खेळवण्यात येणार आहे. संध्याकाळी ७ ला सामन्याला सुरुवात होईल.
हेही वाचा -बॅडमिंटन : भारताच्या सौरभची व्हिएतनाम ओपनच्या अंतिम फेरीत धडक
नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडिजमधील ट्वेन्टी-२० मालिकेत भारताने ३-० असे निर्भेळ यश मिळवले. पण आता टीम इंडियाला बलाढ्य आफ्रिकेविरुद्ध लढावे लागणार आहे. विंडीज मालिकेचा पेपर टीम इंडियाला सोपा गेला असला तरी, क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, कागिसो रबाडा अशा दिग्गज खेळाडूंची भरणा असलेल्या आफ्रिका संघाचे आव्हान खडतर असणार आहे.
फॉर्म गमावून बसलेल्या शिखर धवन आणि लोकेश राहुल यांच्यासाठी ही मालिका महत्वाची असणार आहे. तर, ऋषभ पंतला स्वत:ला सिद्ध करण्यासाठी ही मालिका शेवटची संधी ठरु शकते.
संघ
भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), हार्दिक पंडय़ा, रवींद्र जडेजा, कृणाल पंडय़ा, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, खलील अहमद, दीपक चहर, नवदीप सैनी.
दक्षिण आफ्रिका : क्विंटन डी कॉक (कर्णधार), रॅसी व्हॅन डर डुसेन (उपकर्णधार), टेंबा बव्हुमा, ज्युनियर डाला, बोर्न फॉटर्य़ून, ब्यूरॅन हेन्ड्रिक्स, डेव्हिड मिलर, अॅनरिच नॉर्जे, अँडिले फेहलुकयावो, ड्वेन प्रीटोरियस, कागिसो रबाडा, ताबारेझ शाम्सी, जॉर्ज लिंडे.