तिरूवनंतपुरम - भारत आणि वेस्ट इंडिज विरूद्ध टी-२० मालिकेतील दुसरा सामना तिरूवनंतपुरम येथील ग्रिनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगणार आहे. हैदराबादमध्ये पार पडलेल्या पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवत मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. आजच्या सामन्यातही यश मिळवून मालिका विजयाचे ध्येय टीम इंडियाचे असणार आहे. हा सामना संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल.
हेही वाचा -'भावा!.. तो फटका जबरदस्त होता', कोहलीच्या 'विराट' खेळीची पीटरसनला भूरळ
शुक्रवारी झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजने दिलेले २०८ धावांचे आव्हान १८.४ षटकांत पूर्ण केले होते. या विजयाबरोबरच भारताने त्यांचा टी-२० मधील सर्वोच्च धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करण्याचाही विक्रम नोंदवला होता. विराट कोहलीने नाबाद ९४, तर केएल राहुलने ६२ धावा केल्या होत्या. पहिल्या सामन्यात झालेल्या गचाळ क्षेत्ररक्षणाच्या कामगिरीत सुधारणा करण्याचे आव्हान भारतासमोर असणार आहे.