महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

कोहलीने षटकार ठोकत नोंदवला 'विराट' विक्रम, अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय - भारत विरुद्ध वेस्ट इंडीज

विराट कोहलीने वेस्ट इंडीज विरुद्धच्या सामन्यात हा विक्रम नोंदवला. त्याने १३ व्या षटकात षटकार ठोकून या विक्रमाला गवसणी घातली. असा कारनामा करणारा विराट जगातील तिसरा खेळाडू आहे.

India vs West Indies
कोहलीने षटकार ठोकत नोंदवला 'विराट' विक्रम, अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

By

Published : Dec 11, 2019, 11:06 PM IST

Updated : Dec 11, 2019, 11:42 PM IST

मुंबई- भारत आणि वेस्ट इंडीज संघात ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना वानखेडे मैदानावर रंगला आहे. या सामन्यात विराट कोहलीने आणखी एका विक्रम आपल्या नावे केला. त्याने मायदेशात खेळताना टी-२० क्रिकेटमध्ये १ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो भारताचा पहिला फलंदाज ठरला.

विराट कोहलीने वेस्ट इंडीज विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात हा विक्रम नोंदवला. त्याने १३ व्या षटकात षटकार ठोकून या विक्रमाला गवसणी घातली. असा कारनामा करणारा विराट जगातील तिसरा खेळाडू आहे.

टी-२० क्रिकेटमध्ये यापूर्वी मायदेशात १ हजार धावांचा टप्पा न्यूझीलंडचा मार्टिन गुप्टील आणि कॉलिन मुन्रो यांनी पार केला आहे. दोघांनी मायदेशात खेळताना आतापर्यंत अनुक्रमे १४३० आणि १००० धावा केल्या आहेत.

दरम्यान, या सामन्यात विराट कोहलीने कमी चेंडूत अर्धशतक झळकावणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत आपले नाव नोंदवले. त्याने २१ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आणि या यादीत पाचवे स्थान मिळवले.

  • सर्वात कमी चेंडूत अर्धशतक झळकवणारे भारतीय फलंदाज
  • युवराज सिंग - १२ चेंडूत विरोधी संघ इंग्लंड (२००७)
  • गौतम गंभीर - १९ चेंडूत विरोधी संघ श्रीलंका (२००९)
  • युवराज सिंग - २० चेंडूत विरोधी संघ ऑस्ट्रेलिया (२००७)
  • युवराज सिंग - २० चेंडूत विरोधी संघ श्रीलंका (२००९)
  • विराट कोहली - २१ चेंडूत विरोधी संघ वेस्ट इंडीज (२०१९)
Last Updated : Dec 11, 2019, 11:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details