अँटिग्वा - वेस्ट इंडीज विरुध्दच्या पहिल्या कसोटी सामन्यावर भारताने आपली पकड मजबूत केली आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने ३ बाद १८५ धावा केल्या आहेत. भारतीय कर्णधार विराट कोहली आणि भरवशाचा फलंदाज अजिंक्य रहाणे अर्धशतक झळकावत दोघेही नाबाद खेळत आहेत. दोघांनी केलेल्या या धावसंख्येमुळेच भारताकडे २६० धावांची आघाडी झाली आहे.
VIDEO : मयंक अग्रवालसाठी राहुल ठरला 'खलनायक', केएलने घेतला मयंकचा बळी - india vs west indies २०१९
भारतीय संघ दुसऱ्या डावामध्ये फलंदाजीसाठी मैदानात उतरला. तेव्हा १४ व्या षटकात रोस्टन चेसने मयंक अग्रवाल विरुध्द पायचितचे अपिल केले. त्याचे अपिल पंचानी उचलून धरत मयंक याला बाद घोषीत केले. त्यानंतर पंचाच्या या निर्णयावर मयंकने नाराजी दर्शवत केएल राहुलकडे रिव्ह्यु मागण्याबाबत चर्चा केली. तेव्हा मात्र केएल राहुलने रिव्ह्यु मागण्यास सक्त नकार दिला. यामुळे मयंकला मैदानाबाहेर पडावे लागले.
![VIDEO : मयंक अग्रवालसाठी राहुल ठरला 'खलनायक', केएलने घेतला मयंकचा बळी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4237837-81-4237837-1566731189433.jpg)
दुसऱ्या डावात भारताची खराब सुरुवात झाली. भारताचे आघाडीचे फलंदाज लवकरच परतले. चहापानापर्यंत भारताचे ९८ धावांमध्ये ३ गडी बाद झाले होते. त्यानंतर कर्णधार कोहली आणि रहाणे यांनी शतकी भागिदारी करत भारताचा डाव सावरला. दरम्यान, या सामन्यात केएल राहुलची एक चूक भारताला आणि मयंक अग्रवालला महागात पडली.
नेमक काय घडले -
भारतीय संघ दुसऱ्या डावामध्ये फलंदाजीसाठी मैदानात उतरला. तेव्हा १४ व्या षटकात रोस्टन चेसने मयंक अग्रवाल विरुध्द पायचितचे अपिल केले. त्याचे अपिल पंचानी उचलून धरत मयंक याला बाद घोषित केले. त्यानंतर पंचाच्या या निर्णयावर मयंकने नाराजी दर्शवत केएल राहुलकडे रिव्ह्यु मागण्याबाबत चर्चा केली. तेव्हा मात्र केएल राहुलने रिव्ह्यु मागण्यास सक्त नकार दिला. यामुळे मयंकला मैदानाबाहेर पडावे लागले. नंतर रिप्लेमध्ये पाहिले असता, मयंकच्या पायाला लागलेला चेंडू यष्ट्यांना लागत नसल्याचे दिसून आले. या घटनेनंतर मात्र, केएल राहुलला चाहत्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.