कटक - भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माला वेस्ट इंडीज विरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात २२ वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडण्याची संधी आहे. विशाखापट्टणमच्या दुसऱ्या सामन्यात रोहितने १५९ धावांची दणकेबाज खेळी केली होती. त्यानंतर आता त्याला श्रीलंकेचा सलामीवीर सनथ जयसुर्याचा २२ वर्षापूर्वीचा रेकॉर्ड मोडण्याची संधी आहे.
सनथ जयसुर्याने १९९७ मध्ये, सलामीवीर म्हणून एका वर्षांत सर्वाधिक २३८७ धावा केल्या होत्या. तर रोहित शर्माला हा रेकॉर्ड मोडीत काढण्यासाठी ९ धावांची गरज आहे.
रोहितने या वर्षी सलामीवीर म्हणून २३७९ धावा केल्या आहेत. रोहितने २०१९ या वर्षात एकदिवसीय सामन्यात १४२७, टी-२० त ३९६ आणि कसोटीत ५५६ धावा केल्या आहेत.