फ्लोरिडा- आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये प्रदार्पणाच्या सामन्यातच तीन गडी बाद करून भारतीय संघाच्या विजयात नवदीप सैनीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या या कामगिरीमुळे भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यातील पहिल्याच सामन्यात विजय मिळवत टी-२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. सामना संपल्यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहलीने 'सामनावीर' सैनीचे कौतुक केले.
कोहली म्हणाला, संपूर्ण सामन्यात गोलंदाजांचे वर्चस्व होते. या सामन्यात सैनीने चांगली गोलंदाजी केली. त्याच्याकडे वेग आणि अचूकता आहे. यामुळे तो १५० किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने गोलंदाजी करु शकतो. तसेच तो तंदुरुस्त खेळाडू आहे.