महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

ना..धोनी..ना गांगुली.. विराट कोहलीच भारी, का ते वाचा - सौरभ गांगुली

विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळताना भारतीय संघाने परदेशात सर्वात मोठा विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे भारताने कसोटी क्रिकेटमध्ये मिळवलेल्या सर्वात मोठ्या ( धावांच्या फरकाने) अव्वल ५ पैकी ४ विजय हे विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली मिळविले आहेत.

ना..धोनी..ना गांगुली.. विराट कोहलीच भारी, का ते वाचा

By

Published : Aug 26, 2019, 12:28 PM IST

अँटिग्वा- विराट सेनेने रविवारी यजमान वेस्ट इंडिजवर ३१८ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. विराट सेनेने मिळवलेला हा विजय परदेशात सर्वात मोठा विजय ठरला आहे. यापूर्वी २००७ मध्ये गॅले येथील कसोटीत भारताने श्रीलंकेवर ३०४ धावांनी मात केली होती.

भारताने वेस्ट इंडीजसमोर ४१९ धावांचे बलाढ्य आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना जसप्रीत बुमराहच्या भेदक माऱ्यासमोर विंडीजचा संघ १०० धावांमध्ये ढेपाळला. अजिंक्य रहाणेने पहिल्या डावात अर्धशतक तर दुसऱ्या डावामध्ये शतक (१०२) ठोकले. त्याला हनुमा विहारी (९३) आणि कर्णधार विराट कोहली (५१) यांची साथमिळाली.

रहाणे, विहारी आणि कोहलीच्या जोरावर भारताने विडींजला ४१९ धावांचे आव्हान दिले. गोलंदाजीत पहिल्या डावात ईशांत शर्माने ५ गडी बाद करत खिंडार पाडले. तर दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराहने विडींज खेळाडूंची भंबेरी उडवत ५ गडी बाद केले.

विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळताना भारतीय संघाने परदेशात सर्वात मोठा विजय मिळवला. विशेष म्हणजे भारताने कसोटी क्रिकेटमध्ये मिळवलेल्या सर्वात मोठ्या (धावांच्या फरकाने) अव्वल ५ पैकी ४ विजय हे विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली मिळविले आहेत.

भारताचे मोठ्या फरकाने मिळवलेले विजय -

  • २०१५ साली दिल्लीमध्ये झालेल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका संघाविरुध्द ३३७ धावांनी विजय मिळवला होता.
  • २०१६ साली इंदौर येथे झालेल्या कसोटी सामन्यात भारताने न्यूझीलंडवर ३२१ धावांनी मात केली होती.
  • २००८ साली मोहाली कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाला ३२० धावांनी पराभूत केले होते.
  • २०१७ मध्ये भारताने श्रीलंकेवर ३०४ धावांनी विजय मिळवला होता.
  • २०१९ मध्ये भारताने विडींज संघावर ३१८ धावांनी विजय मिळवला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details