महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

टीम इंडियाचा विंडीज दौरा सुरू.. आज पहिला टी-२० सामना, विराट-रोहितकडे क्रिकेटप्रेमींच्या नजरा - ब्रोवार्ड रिजनल पार्क

आज फ्लोरिडाच्या सेंट्रल ब्रोवार्ड रिजनल पार्कवर हा सामना रंगणार असून तो ८ वाजता सुरु होईल.

india vs west indies first t20 cricket match

By

Published : Aug 3, 2019, 8:34 AM IST

लॉडेरहिल -टीम इंडिया आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेला आजपासून प्रारंभ होत आहे. आयसीसी विश्वकरंडक विजेतेपदापासून मुकलेल्या दोन्ही संघाना आजपासून वेगळ्या प्रवासाला सुरुवात करावी लागणार आहे. आज फ्लोरिडाच्या सेंट्रल ब्रोवार्ड रिजनल पार्कवर हा सामना रंगणार असून तो ८ वाजता सुरु होईल.

टीम इंडियाच्या संघात अष्टपैलू हार्दिक पंडय़ाला संपूर्ण दौऱ्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे त्याची जागा श्रेयस अय्यर आणि मनीष पांडे भरुन काढू शकतात. गोलंदाजीमध्ये भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, दीपक चहर, नवदीप सैनी यांच्यापैकी संघात कोणाचा समावेश होतो ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

या सामन्यापुर्वीच विंडीजच्या संघाला रसेलच्या रुपात धक्का लागला आहे. त्याच्या जागी जेसन मोहम्मदचा समावेस करण्यात आला आहे. असे असले तरी स्फोटक फलंदाज किरॉन पोलार्ड आणि फिरकीपटू सुनील नरिनच्या पुनरागमनामुळे वेस्ट इंडिजची बाजू मजबूत झाली आहे.

भारतीय संघ -

  • विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), कुणाल पांड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, दीपक चहर, नवदीप सैनी.

वेस्ट इंडिजचा संघ -

  • कार्लोस ब्रेथवेट (कर्णधार), जॉन कॅम्पबेल, इविन लुइस, शिमरॉन हेटमायर, निकोलस पूरन, किरॉन पोलार्ड, रोव्हमन पॉवेल, कीमो पॉल, सुनील नरिन, शेल्डन कॉट्रेल, ओशाने थॉमस, अँथनी ब्रॅम्बल, जेसन मोहम्मद, खारी पाएरे.

विंडीजविरुद्ध 3 ते 6 ऑगस्ट या कालावधीत टी-20 मालिका होईल. त्यानंतर 8 ते 14 ऑगस्ट या कालावधीत तीन एकदिवसीय सामने आणि 22 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या कालावधीत दोन कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत. या मालिकेसाठी विराटकडेच कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details