मुंबई - वेस्ट इंडीज विरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक सामन्याआधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय वेगवान गोलंदाज दीपक चहरला दुखापत झाली आहे. यामुळे तो निर्णायक सामना खेळू शकणार नाही. दरम्यान, निर्णायक सामन्यासाठी दीपकच्या ठिकाणी नवदीप सैनीचा समावेश संघात करण्यात आला आहे.
बीसीसीआयकडून मिळालेल्या माहितीनुसार, दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दीपक चहरच्या कमरेला दुखापत झाली. यामुळे त्याला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. बीसीसीआयच्या मेडिकल टीमकडून दीपक चहरच्या कमरेवर उपचार सुरू आहेत.