मुंबई- भारतीय महिला संघाच्या आगामी वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) संघाची घोषणा केली आहे. भारतीय महिला संघ या दौऱ्यात ३ एकदिवसीय आणि ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. दरम्यान, या दौऱ्याला १ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे.
सध्या भारतीय महिला संघ मायदेशात दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाविरुध्द टी-२० मालिका खेळत आहे. आफ्रिकेविरुध्दच्या मालिकेनंतर भारतीय महिला संघ विडींजचा दौरा करणार आहे. या दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेसाठी संघाचे नेतृत्व अनुभवी मिताली राजकडे देण्यात आले आहे. तर टी-२० मालिकेसाठी संघाची धुरा हरमनप्रीत कौरकडे सोपवली आहे. १ ते २० नोव्हेंबर दरम्यान, भारतीय महिला संघाचा वेस्ट इंडिज दौरा रंगणार आहे.
हेही वाचा -रोहित शर्माचे शतक 'इतक्या' धावांनी हुकले
असा आहे एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय महिलांचा संघ -
मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर (उप-कर्णधार), स्मृती मानधना, जेमायमा रॉड्रीग्ज, दिप्ती शर्मा, पुनम राऊत, डी. हेमलता, झुलन गोस्वामी, शिखा पांडे, एकता बिश्त, राजेश्वरी गायकवाड, मानसी जोशी, पूनम यादव, तानिया भाटीया (यष्टीरक्षक), प्रिया पुनिया आणि सुषमा वर्मा.
असा आहे टी-२० मालिकेसाठी भारतीय महिलांचा संघ -
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उप-कर्णधार), जेमायमा रॉड्रीग्ज, शाफाली वर्मा, हरलीन देओल, दिप्ती शर्मा, तानिया भाटीया (यष्टीरक्षक), पूनम यादव, राधा यादव, वेदा कृष्णमुर्ती, अनुजा पाटील, शिखा पांडे, पुजा वस्त्राकर, मानसी जोशी आणि अरुंधती रेड्डी.
हेही वाचा -PAK VS SL : पाकवर वरुणराजा कोपला..पहिला सामना रद्द, दुसऱ्या सामन्यासाठी 'हा' नवीन बदल