महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IND vs WI : पंत कधी सुधारणार ? निर्णायक सामन्यात सोडले तीन झेल

विंडीजविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात पंतने तीन झेल सोडले. महत्वाची बाब म्हणजे, पंतने तिनही झेल कॅच फिरकीपटूंच्या गोलंदाजीवर सोडले. त्यातील दोन झेल तर जडेजाच्या गोलंदाजीवर एका पाठोपाठ एक असे सोडले. तर तिसरा झेल कुलदीप यादवच्या चेंडूवर सोडला.

india vs west indies 3rd odi : rishabh pant dropped three catches at cuttack
IND vs WI : पंत कधी सुधारणार ? निर्णायक सामन्यात सोडले तीन कॅच

By

Published : Dec 22, 2019, 6:50 PM IST

कटक - वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत ऋषभ पंत फलंदाजीत यशस्वी ठरला असला तरी, तो यष्टीरक्षणात मात्र, अपयशी ठरला आहे. त्याने तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात एक नव्हे तर तीन झेल सोडले. यामुळेच सोशल मीडियावर नेटिझन्सनी त्याला पुन्हा एकदा ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

कटकच्या मैदानात आज वेस्ट इंडिजविरुद्ध तिसरा आणि अखेरचा निर्णायक सामना खेळला जात आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे. कारण मालिका सद्यस्थितीत १-१ अशी बरोबरीत आहे. त्यामुळे अखेरच्या सामन्यात भारताला विजय मिळवणे गरजेचे आहे.

विंडीजविरुद्धच्या असा महत्त्वाच्या सामन्यात पंतने तीन झेल सोडले. महत्वाची बाब म्हणजे, पंतने तिनही झेल कॅच फिरकीपटूंच्या गोलंदाजीवर सोडले. त्यातील दोन झेल तर जडेजाच्या गोलंदाजीवर एका पाठोपाठ एक असे सोडले. तर तिसरा झेल कुलदीप यादवच्या चेंडूवर सोडला.

कुलदीप यादवने १६ व्या षटकात टाकलेला चेंडू रोस्टन चेसच्या बॅटचा स्पर्श करुन पंतकडे गेला. पण तो चेंडू पंतला पकडता आला नाही. त्यानंतर २५ व्या षटकात जडेजाच्या दुसरा चेडू हेटमायरच्या बॅटला स्पर्श होऊन पंतच्या हातात गेला. पण त्याला तो झेलता आला नाही. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर हेटमायर फटका खेळण्यास गेला. तेव्हा देखील चेंडूने बॅटचा स्पर्श केला आणि हा झेलही पंतला पकडता आला नाही.

हेही वाचा -फक्त २ षटकार ठोकून विश्वविजेत्या कर्णधाराला हेटमायरने टाकले मागे

हेही वाचा -VIDEO : आफ्रिदी पेचात!..पत्रकार परिषदेत केलेली चूक भोवणार?

ABOUT THE AUTHOR

...view details