नवी दिल्ली - नुकताच झालेल्या वेस्ट इंडीज दौऱ्यामध्ये भारतीय संघाने टी-२०, एकदिवसीय आणि कसोटी मालिका खिशात घातली. महत्वाचे म्हणजे भारतीय संघाने हे यश रवी शास्त्री यांची प्रशिक्षकपदी फेरनियुक्ती झाल्यानंतर मिळवले. या यशानंतर मात्र, रवी शास्त्री यांनाच ट्रोल व्हावे लागले.
झाले असे की, भारतीय प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आपल्या ट्विटर अकांऊटवरुन एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोवरुन ट्रोलर्स मंडळींनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
प्रशिक्षक पदावरुन हटवल्याने संजय बांगर यांची 'सटकली'... निवड समितीकर्त्यासोबत गैरवर्तन
नेमकं काय आहे 'त्या' फोटोमध्ये -
रवी शास्त्री यांनी स्वतःचा एंटीग्वा येथील एका बीचवरील फोटो शेअर केला आहे. यात ते एक हातात बिअरचा ग्लास पकडलेले दिसत आहेत. या फोटोवर ट्रोलर्स मीम्स तयार करुन शास्त्री यांची खिल्ली उडवत आहेत.
ट्रोलर्स कंपनी 'शास्त्री कधीच सुधारणार नाहीत,' 'ए गणपत, चल दारु ला' असा प्रकारच्या प्रतिक्रिया त्या फोटोवर देत आहेत. तर, काही मंडळी सगळ्यांना असे प्रशिक्षक मिळायला हवे, असे म्हणत आहेत.
पहा ट्रोलर्स कंपनीने तयार केलेली मीम्स -