बडोदा -गोलंदाजांनी केलेल्या अफलातून कामगिरीमुळे भारताच्या महिला क्रिकेट संघाने तिसऱया एकदिवसीय सामन्यात आफ्रिकेवर सहा धावांनी सरशी साधली. या विजयामुळे टीम इंडियाने एकदिवसीय सामन्यांची मालिका ३-० ने खिशात घातली आहे.
हेही वाचा -भीषण अपघातात ४ राष्ट्रीय हॉकी खेळाडूंचा मृत्यू, ३ गंभीर
भारताच्या १४६ धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेचा संघ ४८ षटकांमध्ये १४० धावावंर सर्वबाद झाला. आफ्रिकेकडून लाउरा वोल्वार्टने २३, कर्णधार सुन लुसने २४ आणि कापने २९ धावा केल्या. भारताकडून एकता बिश्तने ३२ धावा देत ३ बळी घेतले. तर, दीप्ती शर्माने आणि राजेश्वरी गायकवाडने यांनी २ बळी टिपले. एकता बिश्तला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय भारताच्या अंगउलट आला. भारतासाठी हरमनप्रीत कौरने सर्वाधिक ३८ तर, शिखा पांडेने ३५ धावांची खेळी केली. आफ्रिकेकडून मेरिजाने कापने ३, तर, शबनिम इस्माइल आणि अयाबोंगा खाकाने दोन बळी घेतले. आहेत. मेरिजाने कापला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.