महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

रोहित शर्माने भरमैदानात हासडली पुजाराला शिवी, व्हिडिओ व्हायरल - Rohit Sharma's swear word towards

दुसऱ्या डावात जेव्हा रोहित शर्मा फलंदाजीला उतरला होता. दुसरीकडे मयांक बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या चेतेश्वर पुजारासोबत त्याची जोडी जमली. दोघांनी हळूहळू भागीदारी रचण्यास सुरूवात केली. याच दरम्यान, रोहितला एक चोरटी धाव घ्यायची होती. पण पुजाराने साफ नकार दिला. त्यामुळे रोहितने रागाच्या भरात पुजाराला शिवी दिली.

रोहित शर्माने भरमैदानात हासडली पुजाराला शिवी, व्हिडिओ व्हायरल

By

Published : Oct 5, 2019, 8:02 PM IST

विशाखापट्टणम - भारत विरुध्द दक्षिण आफ्रिका संघातील ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील, पहिला सामना विशाखापट्टणमच्या के राजशेखर रेड्डी मैदानात रंगला आहे. या सामन्यात भारताने सलामीवीर रोहित शर्माच्या दोनही डावातील शतकं आणि मयांकच्या द्विशतकाच्या जोरावर मजबूत पकड मिळवली आहे. मात्र, या सामन्यातील दुसऱ्या डावात फलंदाजी करताना रोहितने आपलाच साथीदार चेतेश्वर पुजाराला शिवी हासडली. यामुळे नेटिझन्सनी रोहितचा चांगला समाचार घेतला.

रोहित शर्मा पहिल्यांदाच कसोटी सलामीवीर म्हणून मैदानात उतरला. त्याने पहिल्या डावात १७६ धावांची खेळी करत आपली उपयुक्तता सिध्द केली. त्यानंतर दुसऱ्या डावातही त्याने १२७ धावांची आक्रमक खेळी करत सलामीवाराचा दावा मजबूत केला. दुसऱ्या डावात रोहित शर्माने रागात आपलाच सहकारी चेतेश्वर पुजाराला शिवी दिली. माईकमध्ये ही शिवी रेकॉर्ड झाली. तसेच चाणाक्ष नेटिझन्सनेही रोहितचा ‘ती’ शिवी लगेच पकडली. अनेकांनी 'त्या' क्षणाचे व्हिडीओ टाकत ट्विटही केले.

नेमकं काय आहे प्रकरण -
दुसऱ्या डावात जेव्हा रोहित शर्मा फलंदाजीला उतरला होता. दुसरीकडे मयांक बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या चेतेश्वर पुजारासोबत त्याची जोडी जमली. दोघांनी हळूहळू भागीदारी रचण्यास सुरूवात केली. याच दरम्यान, रोहितला एक चोरटी धाव घ्यायची होती. पण पुजाराने साफ नकार दिला. त्यामुळे रोहितने रागाच्या भरात पुजाराला शिवी दिली.

या क्षणाचा व्हिडिओ नेटिझन्स ट्विट करत आहेत. महत्वाचे म्हणजे, यावर इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सनेही ट्विट करत रोहितला कोपरखळी मारली. दरम्यान, बेन स्टोक्सने काही दिवसांपूर्वी, विराट जेव्हा बाद होतो तेव्हा माझे नाव घेत असतो. पण मला नंतर 'त्या' शब्दाचा अर्थ कळाला असल्याचे सांगितले होते.

हेही वाचा -IND Vs SA : भारत विजयापासून ९ पाऊल दूर, आफ्रिका चौथ्या दिवसाअखेर १ बाद ११

हेही वाचा -IND vs SA : रोहित शर्माचा 'हिट'शो, दोन्ही डावात शतक ठोकत पराक्रम

ABOUT THE AUTHOR

...view details