महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IND vs SA : रोहित शर्माचा 'हिट'शो, दोन्ही डावात शतक ठोकत पराक्रम

विशाखापट्टणमच्या मैदानात आफ्रिकेविरुध्द सुरू असलेल्या कसोटी सामन्यात रोहित शर्माने पहिल्या डावात १७६ धावांची खेळी केली. त्यानंतर त्याने दुसऱ्या डावातही खणखणीत शतक ठोकत सलामीवीराच्या जागेवर आपला दावा अधिक मजबूत केला. रोहितने दुसऱ्या डावात आक्रमक शतकी खेळी करत अनेक विक्रमांना गवसणी घातली.

IND vs SA : रोहित शर्माचा 'हिट'मॅन शो, दोनही डावात शतक ठोकत केला पराक्रम

By

Published : Oct 5, 2019, 5:12 PM IST

विशाखापट्टणम - दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या कसोटी मालिकेसाठी खराब फॉर्मशी झगडत असलेला लोकेश राहुलला डच्चू देत सलामीवीर म्हणून रोहित शर्माचा संघात समावेश करण्यात आला. भारतीय संघाकडून रोहित सलामीवर म्हणून पहिली कसोटी खेळत असून या कसोटीतील दोन्ही डावात त्याने दणकेबाज खेळ करत आपली प्रतिभा सिध्द केली.

विशाखापट्टणमच्या मैदानात आफ्रिकेविरुध्द सुरू असलेल्या कसोटी सामन्यात रोहित शर्माने पहिल्या डावात १७६ धावांची खेळी केली. त्यानंतर त्याने दुसऱ्या डावातही खणखणीत शतक ठोकत सलामीवीराच्या जागेवर आपला दावा अधिक मजबूत केला. रोहितने दुसऱ्या डावात आक्रमक शतकी खेळी करत अनेक विक्रमांना गवसणी घातली.

कसोटी क्रिकेटमध्ये सलामीला पहिल्यांदाच खेळताना आफ्रिकेविरुध्द दोनही डावात शतक ठोकणारा रोहित पहिला फलंदाज ठरला. तसेच, त्याने भारताकडून एकाच सामन्याच्या दोनही डावात शतके झळकावणाऱ्यांच्या यादीतही स्थान मिळवले.

भारताचे दिग्गज फलंदाज सुनिल गावसकर यांनी तीन वेळा, राहुल द्रविडने दोन वेळा तर विजय हजारे, अजिंक्य रहाणे, विराट कोहली यांनी एकदा, दोनही डावात शतक लगावण्याचा पराक्रम केला आहे. यात आता रोहितचे नाव सामील झाले आहे. दरम्यान, कसोटी क्रिकेटमध्ये पाचव्या-सहाव्या क्रमांकावर अयशस्वी ठरल्यानंतर रोहितला सलामीवीर म्हणून संधी देण्यात आली. त्या संधीचे सोने रोहितने दोन्ही डावात शतक ठोकून केले.

हेही वाचा -IND Vs SA 1ST TEST : चहापानापर्यंत भारताकडे २४६ धावांची आघाडी, दुसऱ्या डावात भारताच्या १ बाद १७५ धावा

हेही वाचा -टीम इंडियाच्या 'या' स्टार खेळाडूवर पार पडली शस्त्रक्रिया, शेअर केला फोटो

ABOUT THE AUTHOR

...view details