धर्मशाला- भारत विरुध्द दक्षिण आफ्रिका संघामधील पहिला टी-२० सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. धर्मशालामध्ये आज रविवार दुपारपासून मुसळधार पाऊस पडत होता. यामुळे मैदानातील पाणी साचले. हे पाणी बाहेर काढता येत नव्हते.
तेव्हा पंचांनी मैदानाच्या परिस्थितीची पाहणी केली आणि अखेर सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा -...म्हणून कुलदीप व चहलची संघात निवड करण्यात आली नाही, विराटचे स्पष्टीकरण
दरम्यान, उभय संघामध्ये ३ टी-२० सामन्याची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे होऊ शकला नाही. १८ सप्टेंबरला दुसरा सामना मोहालीच्या मैदानावर होणार आहे. तर तिसरा सामना २२ सप्टेंबरला बंगलुरुच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे.
हेही वाचा -अॅशेस : 'स्पायडरमॅन' स्टीव्ह स्मिथने पकडलेला अप्रतिम झेल, पाहा व्हिडिओ
धर्मशाला मैदानावर २०१५ मध्ये भारत विरुध्द दक्षिण आफ्रिका संघामध्ये सामना खेळला गेला होता. या सामन्यात भारतीय संघाला पराभूत व्हावे लागले होते. रोहित शर्माने या सामन्यात शतकी खेळी केली होती. मात्र, त्याची शतकी खेळी व्यर्थ ठरली आणि भारतीय संघ या सामन्यात पराभूत झाला होता.