धर्मशाला - दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतीय दौऱ्यावर असून तो भारताविरुध्द तीन टी-२० आणि ३ कसोटी सामन्याची मालिका खेळणार आहे. सुरूवातीला टी-२० मालिका होणार असून या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. आता कसोटी मालिकेसाठी संघ जाहिर करण्यात येणार आहे.
हेही वाचा -जाणून घ्या, भारताच्या पहिल्या शतकवीराबद्दल काही खास गोष्टी
भारत विरुध्द दक्षिण आफ्रिका या उभय संघामध्ये १५ सप्टेंबरपासून टी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला असून विंडीजपाठोपाठ आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेतून महेंद्रसिंह धोनीला विश्रांती देण्यात आली आहे. यामुळे ऋषभ पंतकडे यष्टीरक्षणांची जबाबदारी असणार आहे. पण, कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आलेला नव्हता.
हेही वाचा -विराट आणि अनुष्काच्या फोटोवर चाहते म्हणाले, 'हॉट'
सुत्रानी दिलेल्या माहितीनुसार, आफ्रिकेविरुध्दच्या कसोटी मालिकेसाठी गुरुवारी भारतीय संघाची घोषणा करण्यात येणार आहे. दरम्यान, या मालिकेसाठी 'आऊट ऑफ फॉर्म' असलेला केएल राहुलला डच्चू मिळण्याची शक्यता आहे. राहुलच्या ठिकाणी सलामीवीर म्हणून रोहित शर्माची वर्णी संघात लागू शकते, असे सूचक वक्तव्य निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांनी केले आहे. यामुळे सलामीवीराच्या भूमिकेत रोहित शर्मा कसोटी संघात परतू शकतो.