महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

India vs South Africa ३rd Test : सुपडासाफ...पाहा टीम इंडियाचे खास फोटो - india vs south africa 3rd test team india post bcci photo

भारतीय संघाने या मालिकेत सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. फलंदाजीत रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा आणि मोक्याच्या क्षणी रवींद्र जडेजाने चांगले प्रदर्शन केले. तर गोलंदाजीत मोहम्मद शमी, उमेश यादव, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा यांनी आपली भूमिका चोख बजावली. सांघिक कामगिरीमुळे भारताने आफ्रिकेला 'क्लीन स्वीप' दिले. भारताचा हा ऐतिहासिक विजय पाहण्यासाठी माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीनेही मैदानात हजेरी लावली होती.

India vs South Africa ३rd Test : सुपडासाफ...पाहा टीम इंडियाचे खास फोटो

By

Published : Oct 22, 2019, 12:20 PM IST

Updated : Oct 22, 2019, 12:34 PM IST

रांची- जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धेच्या अंतर्गत भारत-आफ्रिका या दोन संघात रंगलेल्या मालिकेत भारताने आफ्रिकेचा ३-० ने सुपडासाफ केला. महत्वाची बाब म्हणजे, या मालिकेतील २ सामन्यात भारताने आफ्रिकेवर फॉलो-ऑन लादत डाव राखून विजय मिळवला.

भारतीय संघाने या मालिकेत सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. फलंदाजीत रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा आणि मोक्याच्या क्षणी रवींद्र जडेजाने चांगले प्रदर्शन केले. तर गोलंदाजीत मोहम्मद शमी, उमेश यादव, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा यांनी आपली भूमिका चोख बजावली. सांघिक कामगिरीमुळे भारताने आफ्रिकेला 'क्लीन स्वीप' दिले. भारताचा हा ऐतिहासिक विजय पाहण्यासाठी माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीनेही मैदानात हजेरी लावली होती.

पाहा...तिसऱ्या सामन्यातील भारतीय संघाचे काही निवडक फोटो

महेंद्रसिंह धोनी प्रशिक्षक रवी शास्त्रीसोबत...
एका 'फ्रेम'मध्ये कर्णधार विराट, मराठमोळा अजिंक्य आणि हिटमॅन रोहित...
उमेश यादव गडी बाद केल्यानंतर त्याचे अभिनंदन करताना सहकारी खेळाडू...
पदार्पणाच्या सामन्यात गडी बाद केल्यानंतर 'शाहबाज नदीम की उडी तो बनती है बॉस'
'बाबा आता तर सोडा' अस आफ्रिकेचे फलंदाज सांगत होते असे तर जडेजा सांगत नाही ना ?
Last Updated : Oct 22, 2019, 12:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details