महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

India vs South Africa: शाहबाज नदीमचे कसोटीत पदार्पण, ठरला भारताचा २९६ खेळाडू - भारत विरुध्द आफ्रिका तिसरी कसोटी सामना

तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ व्यवस्थापन डावखुरा फिरकीपटू कुलदीप यादवला संधी देणार होते. मात्र शुक्रवारी सरावादरम्यान कुलदीपच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली. यामुळे तो तिसरी कसोटी खेळू शकणार नाही. यामुळे निवड समितीने शाहबाज नदीमला भारतीय संघात स्थान दिले.

India vs South Africa: शाहबाज नदीमचे कसोटीत पदार्पण, ठरला भारताचा २९६ खेळाडू

By

Published : Oct 19, 2019, 11:07 AM IST


रांची- भारत विरुध्द दक्षिण आफ्रिका संघातील ३ सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा कसोटी सामना रांचीच्या मैदानात रंगला आहे. या मालिकेत भारतीय संघाने २-० ने विजयी आघाडी घेतली आहे. तिसऱ्या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, या सामन्यात भारतीय संघाने कुलदीप यादवला दुखापत झाल्याने, संघात निवड झालेला फिरकीपटू शाहबाद नदीमला अंतिम ११ स्थान मिळाले आहे.

तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ व्यवस्थापन डावखुरा फिरकीपटू कुलदीप यादवला संधी देणार होते. मात्र शुक्रवारी सरावादरम्यान कुलदीपच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली. यामुळे तो तिसरी कसोटी खेळू शकणार नाही. यामुळे निवड समितीने शाहबाज नदीमला भारतीय संघात स्थान दिले. कसोटी क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करणारा शाहबाज नदीम २९६ वा खेळाडू ठरला आहे.

रांची येथील खेळपट्टी फिरकीला अनुकूल मानली जात असून या सामन्यात भारतीय संघ जास्तीचा फिरकी गोलंदाज घेऊन उतरणार असे बोलले जात होते. त्या रणनीतीनुसार कर्णधार विराट कोहलीने या सामन्यात विराटने ३ फिरकीपटूंसह उतरणे पसंद केले. ३० वर्षीय शाहबाज नदीमने गेल्या काही हंगामांमध्ये स्थानिक क्रिकेट आणि भारत 'अ' संघाकडून खेळताना चांगली कामगिरी केली आहे. यामुळे त्याला अंतिम ११ स्थान देण्यात आले आहे.

हेही वाचा -India vs South africa 3rd test : विराटने नाणेफेक जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय

हेही वाचा -है तैयार हम! विराट सेना 'क्लीन स्वीप'सह ४० गुणांच्या कमाईसाठी मैदानात

ABOUT THE AUTHOR

...view details