पुणे- भारताने आफ्रिकेविरुध्दच्या ३ सामन्यांच्या मालिकेत पहिला सामना जिंकून १-० अशी आघाडी घेतली. त्यानंतर आता पुण्याच्या गहुंजे मैदानात रंगलेल्या सामन्यात भारतीय संघाने सावध सुरुवात केली. पहिल्या कसोटीत दोनही डावात शतकं झळकावलेला रोहित शर्मा स्वस्तात बाद झाला. त्यानंतर मयांक आणि चेतेश्वर पुजारा या जोडीने भारताचा डाव सावरला.
पहिल्या डावाच्या पहिल्या सत्रात आफ्रिकेच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला. या माऱ्यामुळे भारतीय फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची संधी मिळाली नाही. या सत्रात भारतीय सलामीवीर मयांक अग्रवालवर आफ्रिकी गोलंदाजांनी बाऊन्सरचा मारा केला. यादरम्यान, एक चेंडू मयांकच्या हेल्मेटवर आदळला. तेव्हा भारतीय चाहत्यांचा काळजाचा ठोका चुकला.