महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

विराटने खेळली 'अशी' खेळी की, आफ्रिकेला मालिका जिंकणे कदापीही शक्य नाही - भारतीय संघ

भारत विरुध्द दक्षिण आफ्रिका संघामध्ये ३ सामन्याची टी-२० मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिला सामना धर्मशाला येथे होणार होता. मात्र, पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला. दुसरा सामना भारताने ७ गडी राखून जिंकला. राहिला एक सामना, जर हा सामना भारताने जिंकला तर मालिकेवर भारताचा कब्जा होईल. पण हा सामना जर आफ्रिकेने जिंकला तर मालिका बरोबरीत सुटेल.

विराटने खेळली 'अशी' खेळी की, आफ्रिकेला मालिका जिंकणे कदापीही शक्य नाही

By

Published : Sep 19, 2019, 4:33 PM IST

मोहाली- टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुध्दचा दुसरा टी-२० सामना ७ गडी राखून जिंकला. या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने ७२ धावांची नाबाद खेळी केली. त्याच्या या खेळीसाठी त्याचा सामनावीर पुरस्काराने गौरव करण्यात आला. कोहलीच्या कामगिरीने एक गोष्ट मात्र पक्की झाली, टीम इंडिया आता मालिका गमावणार नाही.

दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत निर्धारीत २० षटकात ५ गडी बाद १४९ धावा केल्या. आफ्रिकेचे १५० धावांचे आव्हान भारताने १९ षटकात ३ गड्यांच्या मोबदल्यात सहज पूर्ण केले.

हेही वाचा -आजच्या दिवशीच युवराजने ठोकले ६ चेंडूत ६ षटकार, पाहा व्हिडिओ

दरम्यान, भारत विरुध्द दक्षिण आफ्रिका संघामध्ये ३ सामन्याची टी-२० मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिला सामना धर्मशाला येथे होणार होता. मात्र, पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला. दुसरा सामना भारताने ७ गडी राखून जिंकला. राहिला एक सामना, जर हा सामना भारताने जिंकला तर मालिकेवर भारताचा कब्जा होईल. पण हा सामना जर आफ्रिकेने जिंकला तर मालिका बरोबरीत सुटेल. यामुळे टीम इंडिया ही मालिका गमावणार नाही. हे मात्र, नक्की झाले आहे.

हेही वाचा -विराटने साधली शाहिद आफ्रिदीच्या विक्रमाशी बरोबरी, आफ्रिदी म्हणतो...

विजयी सामन्यात विराट कोहलीने ५२ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने नाबाद ७२ धावा केल्या. तर शिखर धवनने ४० धावा करत भारताला विजयाजवळ नेले. श्रेय्यस अय्यरसोबत विराटने भारतीय संघाला विजय मिळवून दिला.

ABOUT THE AUTHOR

...view details