महाराष्ट्र

maharashtra

ना धोनी ना रिचर्ड्स ना वॉन... विराटचं भारी, वाचा आणि तुम्हीच ठरवा

By

Published : Oct 6, 2019, 5:14 PM IST

विराटने आपल्या नेतृत्वात आफ्रिकेला २०३ धावांची धूळ चारली. यानंतर विराटने वेस्ट इंडिजचे महान कर्णधार सर विवियन रिचर्ड्स, भारताचा महेंद्रसिंह धोनी आणि मायकल वॉन यांना मागे टाकले. आपल्या नेतृत्वात संघाला विजय मिळवून देणाऱ्या यादीत विराट तिसऱ्या स्थानावर आहे. पहिल्या स्थानावर स्टिव्ह वॉ त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग ३४ विजयासह दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे. तर विराटने तिसऱ्या स्थानावर मजल मारली आहे.

ना धोनी ना रिचर्ड्स ना वॉन... विराटचं भारी, वाचा आणि तुम्हीच ठरवा

नवी दिल्ली - विराट कोहलीच्या नेतृत्वात, दक्षिण आफ्रिकेविरुध्द सुरू असलेल्या ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना भारतीय संघाने जिंकला. वेस्ट इंडीजला २-० ने धूळ चारल्यानंतर विराटच्या नेतृत्वात भारतीय संघाने विजयी लय कायम राखली. आफ्रिकेविरुध्दच्या विजयानंतर विराटने कर्णधार या नात्याने एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

विशाखापट्टणम येथे पार पडलेला कसोटी सामना हा विराटसाठी कर्णधार या नात्याने ४९ वा कसोटी सामना होता. विराटने ४९ कसोटी सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करताना २९ विजय मिळवले आहेत. दरम्यान, आपल्या नेतृत्वात संघाला विजय मिळवून देणाऱ्या खेळाडूंच्या यादीत, अग्रस्थानी ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह वॉ आहे. त्याने आपल्या नेतृत्वात ३६ कसोटी सामन्यात संघाला विजय मिळवून दिला आहे.

विराट कोहली आक्रमक रुपामध्ये...

विराटने आपल्या नेतृत्वात आफ्रिकेला २०३ धावांची धूळ चारली. यानंतर विराटने वेस्ट इंडिजचे महान कर्णधार सर विवियन रिचर्ड्स, भारताचा महेंद्रसिंह धोनी आणि मायकल वॉन यांना मागे टाकले. आपल्या नेतृत्वात संघाला विजय मिळवून देणाऱ्या यादीत विराट तिसऱ्या स्थानावर आहे. पहिल्या स्थानावर स्टिव्ह वॉ त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग ३४ विजयासह दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे. तर विराटने तिसऱ्या स्थानावर मजल मारली आहे.

विराट कोहली मैदानात....

कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या नेतृत्वात सर्वाधिक विजय मिळवून देणारे टॉप कर्णधार -

  • स्टिव्ह वॉ - ३६ विजय
  • रिकी पाँटिंग - ३४ विजय
  • विराट कोहली - २९ विजय
  • विवियन रिचर्ड्स - २७ विजय
  • मायकल वॉन - २६ विजय
  • महेंद्रसिंह धोनी - २६ विजय

ABOUT THE AUTHOR

...view details