विशाखापट्टणम- दक्षिण आफ्रिका विरोधातील पहिला सामना भारताने २०३ धावांनी जिंकला. फलंदाजांनी या सामन्यात पहिल्यांदा चांगली फलंदाजी करत विजयाचा पाया रचला. त्यावर गोलंदाजांनी धारधार गोलंदाजी करत विजयावर मोहोर लावली. या सामन्यात दोनही डावात शतकं ठोकणाऱ्या रोहितला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. रोहितने सामन्यानंतर मोहम्मद शमीच्या गोलंदाजीचे असे कौतूक केले की, पत्रकारांमध्ये एकच हशा पिकला.
हेही वाचा -रोहित है तो मुमकिन है!.. 'या' विक्रमामध्ये रोहितच्या आसपासही कोणी नाही
आफ्रिकेविरुध्दच्या सामन्यात मोहम्मद शमीने दुसऱ्या डावात भेदक गोलंदाजीचा नजराणा पेश केला. त्याने या डावात ३५ धावा देत ५ गडी तंबूत धाडले. सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत रोहितने शमीचे कौतुक करत त्याच्या यशाचे रहस्य सांगितले तेव्हा पत्रकारांमध्ये हशा पिकला. याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
आफ्रिकेविरुध्दच्या सामन्यातील क्षण...
“सगळ्यांना माहित आहे की शमी जेव्हा फ्रेश असतो तेव्हा तो काहीही करु शकतो. त्यासोबत थोडी बिर्याणी असली की तर, मग.. ”, अशी मस्करी करत रोहितने शमीची फिरकी घेतली. रोहितची मस्करी ऐकूण पत्रकारांनाही हसू आवरले नाही. दरम्यान, शमीला बिर्याणी खूप आवडते. त्याला जेव्हा संधी मिळते तेव्हा तो फक्त बिर्याणीवर ताव मारतो. मात्र, त्याने फिट राहण्यासाठी बिर्याणीचा त्याग केला आहे.
हेही वाचा -ना धोनी ना रिचर्ड्स ना वॉन... विराटचं भारी, वाचा आणि तुम्हीच ठरवा