महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

रोहित शर्मा : आयसीसीच्या क्रिकेट इतिहासात 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू - india vs south africa 2019

दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या पहिल्या सामन्यात शतकी खेळीनंतर रोहितने एक अनोखा विक्रम केला आहे. आयसीसीच्या तीन मोठ्या स्पर्धेत शतक ठोकणारा रोहित पहिलाच खेळाडू ठरला आहे. त्याने आयसीसी चॅम्पियन चषक स्पर्धा, आयसीसी विश्वकरंडक स्पर्धा आणि आता आयसीसी कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धा या तिनही  मोठ्या स्पर्धेत शतक झळकावले आहे, असा कारनामा रोहितशिवाय क्रिकेटविश्वात कोणत्याही खेळाडूला अद्याप करता आलेला नाही.

रोहित शर्मा : आयसीसीच्या क्रिकेट इतिहासात 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू

By

Published : Oct 2, 2019, 5:55 PM IST

विशाखापट्टणम- दक्षिण आफ्रिकेविरुध्द विशाखापट्टणम येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात रोहित शर्माने पहिल्याच दिवशी नाबाद शतकी खेळी केली. रोहितने या शतकी खेळीबरोबर, जगभरातील कोणत्याही खेळाडूला जमला नाही, असा अनोखा विक्रम केला आहे.

हेही वाचा -स्टार्कच्या बायकोचा विश्वविक्रम, टी-२० क्रिकेटमध्ये ठोकल्या नाबाद १४८ धावा!

नाणेफेक जिंकून भारतीय संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. तेव्हा सलामीवीर म्हणून प्रथमच रोहित शर्मा मैदानात उतरला. त्याने आपला दुसरा सलामी जोडीदार मयांक अग्रवाल याच्यासह ५९.१ षटकात २०२ धावांची नाबाद सलामी दिली. यात रोहित शर्माने १२ चौकार आणि ५ षटकाराच्या मदतीने नाबाद ११५ धावांची खणखणीत खेळी केली.

दरम्यान, या खेळीनंतर रोहितने एक अनोखा विक्रम केला आहे. आयसीसीच्या तीन मोठ्या स्पर्धेत शतक ठोकणारा रोहित पहिलाच खेळाडू ठरला आहे. त्याने आयसीसी चॅम्पियन चषक स्पर्धा, आयसीसी विश्वकरंडक स्पर्धा आणि आता आयसीसी कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धा या तिनही मोठ्या स्पर्धेत शतक झळकावले आहे, असा कारनामा रोहितशिवाय क्रिकेटविश्वात कोणत्याही खेळाडूला अद्याप करता आलेला नाही.

हेही वाचा -IND VS SA : 'हिटमॅन'ची ऐतिहासिक सलामी, रचले 'हे' खास विक्रम

ABOUT THE AUTHOR

...view details