धर्मशाळा - भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये पहिला ट्वेन्टी-२० सामना हिमाचल प्रदेशच्या धर्मशाळा येथील मैदानावर खेळवण्यात येणार आहे. मात्र, या सामन्यावर पावसाचे सावट आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार रविवारी धर्मशाळेत ढगाळ वातावरण असेल, त्यामुळे संध्याकाळी पावसामुळे सामन्यात व्यत्यय येण्याची दाट शक्यता आहे.
हेही वाचा -India vs South Africa : 'या' दिवशी होणार भारतीय संघाची घोषणा, रोहितचे कमबॅक?
आफ्रिकेविरुध्दच्या पहिल्या सामन्याला काही दिवस राहिले असून मैदानावरील कर्मचारी खेळपट्टी आणि मैदान खेळण्या योग्य करण्यासाठी मेहनत घेत आहेत. दरम्यान, मागील काही दिवसांमध्ये धर्मशाळा परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे खेळपट्टी आणि मैदान खेळण्यायोग्य करण्यासाठी काही दिवसांचा कालावधी लागतो. त्यात आता हवामान खात्याने रविवारी पुन्हा पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे हा सामना पूर्ण होईल की नाही हे सांगता येणे कठीण बनले आहे.