धर्मशाळा - येथील मैदानावर भारत विरुध्द दक्षिण आफ्रिका या संघामध्ये टी-२० मालिकेतील पहिला सामना खेळवण्यात येणार आहे. परंतु, या सामन्यावर पावसाचे सावट असून सामन्यापूर्वी मैदानावर पावसाने हजेरी लावली. त्यामुळे मैदानावर कव्हर्स टाकण्यात आले आहेत. त्यामुळे हा सामना होणार की नाही याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. यामुळे क्रीडाप्रेमींची चिंता वाढली आहे.
हेही वाचा -अॅशेस : 'स्पायडरमॅन' स्टीव्ह स्मिथने पकडलेला अप्रतिम झेल, पाहा व्हिडिओ
पहिला टी-२० सामना सायंकाळी सात वाजता सुरू होणार आहे. मात्र, या सामन्यापूर्वी पावसाने हजेरी लावली. जरी पाऊस झाला असला तरी धर्मशाला मैदानाची ड्रेनेज सिस्टिम उत्तम आहे. त्यामुळे पाऊस लवकर थांबल्यास हा सामना पूर्ण होऊ शकतो. पण, पावसाचा जोर कायम राहिल्यास आणि मैदान सुकण्यासाठी वेळ लागल्यास सामन्यातील काही षटके कमी केली जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा -टी-20 क्रिकेटमधे नवीन करिश्मा; 'या' दोन फलंदाजांनी सलग 7 चेंडूत ठोकले 7 षटकार
दरम्यान, बीसीसीआयचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकर यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर धर्मशाळा मैदानाचा एक छोटासा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मैदानावर कव्हर्स दिसून येत असून पाऊसही सुरू आहे. हवामान विभागानेही धर्मशालामध्ये दिवसभर पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.