कराची - भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामने नेहमीच 'फुल्ल अॅक्शन पॅक्ड' होत असतात. या सामन्याच्या वेळी वातावरणही काही वेगळेच असते. दोन्ही देशातील क्रिकेट चाहत्यांचा उत्साह यावेळी पाहण्यालायक असतो. परंतु मागील अनेक वर्षांपासून उभय संघात सामने झालेली नाहीत. पण आता उभय संघात टी-२० मालिका खेळवण्यात येण्याची शक्यता आहे. पाकिस्तानचे उर्दू वर्तमानपत्र 'डेली जंग'ने या संदर्भातील वृत्त दिले आहे.
डेली जंगने दिलेल्या वृत्तानुसार, भारत आणि पाकिस्तान यांच्यात या वर्षी टी-२० सामन्याची मालिका खेळवण्यात येऊ शकते. डेली जंगने सूत्रांच्या आधारावर या संदर्भातील वृत्त दिले आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या संदर्भात पहिल्यांदा बोलण्यास नकार दिला. परंतु त्याने नंतर उभय संघातील मालिकेची तयारी करण्यास सांगितले असल्याची कबुली दिली.
सूत्रांच्या महितीनुसार, भारत-पाकिस्तान संघात तीन सामन्याची टी-२० मालिका होणार आहे. या मालिकेसाठी ६ दिवसांचा विंडो पहिला जात आहे.