मॅनचेस्टर -विश्वचषकात पाकिस्तानची भारताकडून होणाऱ्या 'धुलाई'ची परंपरा या स्पर्धेतही कायम राहिली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलींच्या बॅटने पाकिस्तानच्या गोलंदाजांचा समाचार घेत ३३६ धावा केल्या. या आव्हानाचा यशस्वीपणे पाठलाग पाकिस्तानच्या फलंदाजांची चांगलीच दमछाक झाली. पावसाच्या व्यत्ययामुळे नियमानुसार पाकिस्तानला ४० षटकांमध्ये ३०२ धावांचे आव्हान देण्यात आले. पण ढेपाळलेल्या पाकिस्तानला भारताचे आव्हान पेलवले नाही. डकवर्थ-लुईस नियमानुसार भारताने पाकिस्तानवर ८९ धावांनी विजय मिळविला.
रोहित शर्माच्या १४० धावांच्या शतकी आणि कर्णधार विराट कोहलीच्या ७७ धावांच्या जोरावर भारताने पाकिस्तानसमोर विजयासाठी ३३७ धावांचे आव्हान दिले. पाकिस्तानकडून मोहम्मद आमीरने सर्वाधिक ३ विकेट घेतल्य. तर हसन अली आणि वहाब रियाझ यांना १-१ विकेट घेण्यात यश आले.
मॅनचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात पाकने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीला पाचारण केले होते. यानंतर भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि लोकेश राहुलने दमदार फलंदाजी करत पहिल्या विकेटसाठी १३६ धावांची भागीदारी रचली.