महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IND vs NZ : लढाई वर्चस्वाची..! जाणून घ्या कसोटी मालिकेचे वेळापत्रक आणि रेकॉर्ड - भारत विरुद्ध न्यूझीलंड

भारत न्यूझीलंड कसोटी मालिका दौऱ्यात कोणाचे वर्चस्व यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. तसेच भारतीय संघाला ही मालिका जिंकून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची दावेदारी भक्कम करण्याची संधी आहे.

india vs new zealand test series schedule and records
IND vs NZ : लढाई वर्चस्वाची, जाणून घ्या कसोटी मालिकेचे वेळापत्रक आणि रेकॉर्ड

By

Published : Feb 18, 2020, 12:04 PM IST

हॅमिल्टन- भारतीय संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. उभय संघात पहिल्यांदा टी-२० मालिका खेळवण्यात आली. यात भारताने ५-० ने निर्भेळ यश मिळवले. यानंतर न्यूझीलंडने ३ एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत भारताला ३-० ने व्हाईटवॉश दिला आणि पराभवाची परतफेड केली. आता उभय संघात २१ फेब्रुवारीपासून कसोटी मालिकेला सुरूवात होणार आहे. ही मालिका दौऱ्यात कोणाचे वर्चस्व यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. तसेच भारतीय संघाला ही मालिका जिंकून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची दावेदारी भक्कम करण्याची संधी आहे.

उभय संघात पहिला कसोटी सामना २१ ते २५ फेब्रुवारी या काळात वेलिंग्टन येथे खेळला जाणार आहे. तर दुसरा कसोटी सामना २९ फेब्रुवारी ते ०४ मार्च दरम्यान ख्राइस्टचर्च येथे होणार आहे. दोन्ही सामने भारतीय प्रमाण वेळेनुसार पहाटे ४ वाजता सुरु होणार आहेत.

दरम्यान दोन्ही संघात आतापर्यंत २१ कसोटी मालिका झाल्या आहेत. यापैकी ११ मालिका भारताने जिंकल्या आहेत तर पाच मालिकेत न्यूझीलंडने विजय मिळवला आहे. कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंड संघात ट्रेंट बोल्टचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे न्यूझीलंडच्या गोलंदाजाची धार वाढली आहे.

ट्रेंट बोल्ट

भारत-न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेचे वेळापत्रक -

  • पहिली कसोटी : २१ ते २५ फेब्रुवारी- वेलिंग्टन
  • दुसरी कसोटी : २९ फेब्रुवारी ते ०४ मार्च- ख्राइस्टचर्च
  • (दोन्ही सामने भारतीय वेळेनुसार पहाटे ४.०० वाजता सुरू होणार)

असा आहे भारताचा कसोटी संघ -

  • विराट कोहली (कर्णधार), मयांक अगरवाल, पृथ्वी शॉ, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, वृद्धिमान साहा, ऋषभ पंत, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, मोहम्मद शमी, नवदीप सैनी आणि इशांत शर्मा.

असा आहे न्यूझीलंडचा कसोटी संघ -

  • केन विल्यम्सन (कर्णधार), टॉम ब्लन्डेल, ट्रेंट बोल्ट, कॉलिन डे ग्रॅंडहोम, काईल जेमिसन, टॉम लॅथम, डेरी मिशेल, हेन्री निकोलस, अजाझ पटेल, टीम साऊदी, रॉस टेलर, निल वॅगनर आणि बीजे वॉलटिंग.

हेही वाचा -

Women T२० WC २०२० : भारतीय संघाची कामगिरी अन् विश्व करंडकाबाबत बरंच काही, जाणून घ्या

हेही वाचा -

VIDEO: सचिनच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, क्रीडा क्षेत्रातील 'ऑस्कर'ने सन्मान

ABOUT THE AUTHOR

...view details