महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IND vs ENG: चेन्नईतील पराभव; भारतीय संघाच्या नावे नकोशा विक्रमांची नोंद

इंग्लंडने भारतासमोर विजयासाठी ४२० धावांचे मोठे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ १९२ धावांवर ऑलआउट झाला. चेन्नईतील या मानहानिकारक पराभवानंतर भारतीय संघाच्या नावे नकोशा विक्रमांची नोंद झाली आहे. वाचा काय आहेत, ते...

india vs england chennai test stats review
IND vs ENG: चेन्नईतील पराभव; भारतीय संघाच्या नावे नकोशा विक्रमांची नोंद

By

Published : Feb 9, 2021, 4:51 PM IST

चेन्नई - भारत आणि इंग्लंड यांच्यात चेन्नई येथील एम. ए. चिदंबरम स्टेडियममध्ये खेळला गेलेला कसोटी सामना पाहुण्या संघाने २२७ धावांनी जिंकला. या विजयासह इंग्लंडने ४ सामन्याच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. इंग्लंडने भारतासमोर विजयासाठी ४२० धावांचे मोठे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ १९२ धावांवर ऑलआऊट झाला. चेन्नईतील या मानहानिकारक पराभवानंतर भारतीय संघाच्या नावे नकोशा विक्रमांची नोंद झाली आहे. वाचा काय आहेत, ते...

  • १९९९ नंतर भारतीय संघ चेन्नईत पराभूत झाला आहे. १९९९ मध्ये पाकिस्तानने भारताचा १२ धावांनी पराभव केला होता.
  • विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाचा सलग चौथ्या कसोटी सामन्यात पराभव झाला आहे.
  • भारताच्या दुसऱ्या डावात चार फलंदाज त्रिफाळाचित झाले. याआधी आठ वर्षांपूर्वी टॉप-५ मधील चार फलंदाज त्रिफाळाचित झाले होते. हा सामना भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. विशेष म्हणजे, हा सामना चेन्नईतच झाला होता.
  • भारतीय संघ मायदेशातील, मागील १४ कसोटी सामन्यात, प्रथमच दोन्ही डावात ऑलआऊट झाला आहे. याआधी २०१७ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ही वेळ भारतीय संघावर आली होती.
  • जेम्स अँडरसनचा भारतातील हा चौथा विजय आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details