चेन्नई - भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला ५ फेब्रुवारीपासून चेन्नईमध्ये सुरुवात होणार आहे. या कसोटीआधी भारताचा मराठमोळा खेळाडू अजिंक्य रहाणेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. रहाणे या व्हिडिओत तिच्या मुलीसह मस्ती करताना पाहायला मिळत आहे.
उभय संघातील मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय खेळाडूंना कुटुंबीयांसोबत राहण्याची मुबा दिली आहे. त्यामुळे भारताचे अनेक खेळाडू या दौऱ्यात पत्नी आणि मुलांसह प्रवास करत आहेत. भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे देखील त्याची पत्नी आणि मुलीसह चेन्नईत दाखल झाला आहे. सध्या ते सर्व जण चेन्नईमधील एका हॉटेलमध्ये क्वारंटाईन कालावधी पूर्ण करत आहेत.
अजिंक्यची पत्नी राधिकाने या क्वारंटाइन काळादरम्यान, इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात अजिंक्य त्याची मुलगी आर्यासोबत डान्स करताना पाहायला मिळत आहे. सहा दिवस क्वारंटाइन राहण्याच्या काळात विरंगुळा म्हणून अजिंक्य त्याच्या लेकीसोबत धमाल करत आहे. दरम्यान, राधिकाने शेअर केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.