पुणे - भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना पुण्यात खेळवला जात आहे. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत १-१ अशी बरोबरी असल्याने आजचा सामना मालिका विजयासाठी निर्णायक सामना आहे. इंग्लंडने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतीय संघाने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी आपल्या संघात एक बदल केला आहे. फिरकीपटू कुलदीप यादव याला डच्चू देत भारतीय संघात वेगवान गोलंदाज टी. नटराजन याचा समावेश करण्यात आला आहे. आजच्या सामन्यात भारतीय संघात एकही पूर्णवेळ फिरकीपटूचा समावेश नाही. दुसरीकडे इंग्लंड संघाने देखील आपल्या संघात एक बदल केला आहे. टॉम कुरेनला डच्चू देत त्यांनी मार्क वूडला अंतिम संघात स्थान दिले आहे.
- भारतीय संघ -
- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), शिखर धवन, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल, हार्दिक पांड्या, क्रुणाल पांड्या, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, प्रसिद्ध कृष्णा आणि शार्दुल ठाकुर.
- इंग्लंडचा संघ -
- जोस बटलर (कर्णधार), जॉनी बेयरस्टो, जेसन रॉय, बेन स्टोक्स, डेविड मलान, सॅम कुरेन, लियाम लिविंगस्टोन, आदिल राशिद, रीस टॉपले, मार्क वुड आणि मोइन अली.