पुणे - भारतीय संघाचा डावखुरा सलामीवीर शिखर धवन याने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात अप्रतिम फलंदाजी केली. मात्र, त्याचे शतक अवघ्या दोन धावांनी हुकले. त्याने १०६ चेंडूत ११ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ९८ धावांची खेळी केली. याआधी देखील धवन नर्वस नाईंटीजचा शिकार ठरला आहे.
शिखर धवन इंग्लंडविरोधात एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावांची खेळी केली. पण तो ९८ धावांवर बाद झाला. शिखर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवव्यांदा नर्वस नाईंटीजचा शिकार झाला आहे. याबाबतीत त्याने सौरव गांगुलीशी बरोबरी साधली. गांगुली देखील ९ वेळा नर्वस नाईंटीजचा शिकार ठरला आहे.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये शिखर पाचव्यांदा नर्वस नाईंटीजवर बाद झाला. तर एकवेळा शिखर ९७ धावांवर नाबाद राहिला होता. त्यावेळी त्याचे शतक ३ धावांनी राहिले होते. दरम्यान, भारताकडून सर्वाधिक वेळा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नर्वस नाईंटीजचा शिकार सचिन तेंडुलकर ठरला आहे. सचिन तब्बल २७ वेळा नर्वस नाईंटीजमध्ये बाद झाला आहे.
शिखर धवन एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाच वेळा नर्वस नाईंटीजचा ठरला शिकार
- ९५ विरुद्ध ऑस्ट्रेलिया, जयपूर, २०१३
- ९४ विरुद्ध श्रीलंका, फतुल्लाह, २०१४
- ९१ विरुद्ध श्रीलंका, हैदराबाद, २०१४
- ९६ विरुद्ध ऑस्ट्रेलिया, राजकोट, २०२०
- ९८ विरुद्ध इंग्लंड, पुणे, २०२१
(२ सप्टेबर २०१४ रोजी इंग्लंडविरुद्ध बर्मिंघहॅम येथे झालेल्या सामन्यात ९७ धावांवर नाबाद राहिला होता.)