महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

पंतचे करिअर धोक्यात, अय्यर म्हणतो निवड समितीनं मला चौथ्या क्रमांकासाठी तयार राहण्यास सांगितलंय - भारत विरुध्द बांगलादेश

विश्वकरंडक स्पर्धेपासून टीम इंडियामध्ये चौथ्या क्रमाकांवर कोण फलंदाजी करणार?  हा प्रश्न सुटलेला नव्हता. तो आता श्रेयसच्या रुपाने सुटला आहे. श्रेयसने बांगलादेशविरुध्दच्या निर्णायक सामन्यात ३३ चेंडूत ६२ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत ३ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता. यामुळे टीम इंडियाच्या व्यवस्थापनाने देखील श्रेयस अय्यरला चौथ्या क्रमांकासाठी आपली पहिली पसंती दिली आहे.

पंतचे करिअर धोक्यात, अय्यरने म्हणाला निवड समितीनं मला चौथ्या क्रमांकासाठी तयार राहण्यास सांगितलयं

By

Published : Nov 12, 2019, 9:45 AM IST

नवी दिल्ली - टीम इंडियाने बांगलादेश विरुध्दच्या ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेत २-१ बाजी मारली. पहिला सामना गमावल्यानंतर टीम इंडियाने राहिलेल्या दोनही सामन्यात बांगलादेशला धूळ चारली. अखेरच्या निर्णायक सामन्यात मागील काही सामन्यात ऑऊट ऑफ फार्म असलेल्या लोकेश राहुलची बॅट तळपली. राहुलसह श्रेयस अय्यरनेही दमदार खेळ करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. यामुळे श्रेयसच्या रुपाने टीम इंडियाला चौथा क्रमाकांचा फलंदाज मिळाला आहे.

विश्वकरंडक स्पर्धेपासून टीम इंडियामध्ये चौथ्या क्रमाकांवर कोण फलंदाजी करणार? हा प्रश्न सुटलेला नव्हता. तो आता श्रेयसच्या रुपाने सुटला आहे. श्रेयसने बांगलादेशविरुध्दच्या निर्णायक सामन्यात ३३ चेंडूत ६२ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत ३ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता. यामुळे टीम इंडियाच्या व्यवस्थापनाने देखील श्रेयस अय्यरला चौथ्या क्रमांकासाठी आपली पहिली पसंती दिली आहे.

श्रेयस अय्यर

याविषयी अखेरच्या सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना श्रेयसने सांगितले की, 'मला संघ व्यवस्थापनानं चौथ्या क्रमांकासाठी पसंती दिली आहे. तू चौथ्या क्रमांकावर खेळणार आहेस, त्यामुळे स्वतःची मानसिक तयारी कर.'

महेंद्रसिंह धोनीचा वारसदार म्हणून पहिले जात असलेल्या ऋषभ पंतला मागील काही सामन्यात अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. यामुळे आगामी मालिकांमध्ये श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावर खेळताना दिसेल. श्रेयस चौथ्या क्रमांकावर कशी कामगिरी करणार याकडे सर्वाचे लक्ष असणार आहे.

हेही वाचा -Hong Kong Open : सात्विक-चिराग जोडी फॉर्मात, सिंधू सायनाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष

हेही वाचा -भारतीय गोलंदाजीसाठी 'अच्छे दिन', 'या' गोलंदाजांनी १ वर्षात साधल्या ३ 'हॅट्ट्रिक'

ABOUT THE AUTHOR

...view details