महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

इंदूर कसोटीआधीच बांगलादेशींना भरली धडकी, 'या' खेळाडूने दिली कबुली - भारत विरुध्द बांगलादेश इंदूर कसोटी

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत भारतीय संघाचे अव्वलस्थान कायम आहे. बांगलादेश विरुध्दची मालिका जिंकून भारतीय संघ हे अव्वलस्थान भक्कम करण्याच्या उद्देशात आहे. पहिला सामना १४ ते १८ नोव्हेंबर दरम्यान रंगणार असून यापूर्वीच बांगलादेशचा खेळाडू मोहम्मद मिथूनला भारतीय गोलंदाजीची भीती वाटू लागली आहे.

इंदूर कसोटीआधीच बांगलादेशींना भरली धडकी, 'या' खेळाडूने दिली कबुली

By

Published : Nov 13, 2019, 12:31 PM IST

इंदूर - भारत आणि बांगलादेश संघामध्ये उद्यापासून (गुरुवार) पहिला कसोटी सामना इंदूरच्या होळकर मैदानात खेळला जाणार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने भारतासाठी हा सामना महत्वपूर्ण आहे. यामुळे भारतीय संघाचा या सामन्यासह मालिका जिंकण्यासाठी उत्सुक आहे. दरम्यान, या सामन्याआधीच बांगलादेशच्या खेळाडूंमध्ये भारतीय गोलंदाजीची भीती निर्माण झाली आहे.

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत भारतीय संघाचे अव्वलस्थान कायम आहे. बांगलादेश विरुध्दची मालिका जिंकून भारतीय संघ हे अव्वलस्थान भक्कम करण्याच्या उद्देशात आहे. पहिला सामना १४ ते १८ नोव्हेंबर दरम्यान रंगणार असून यापूर्वीच बांगलादेशचा खेळाडू मोहम्मद मिथूनला भारतीय गोलंदाजीची भीती वाटू लागली आहे.

मिथून म्हणाला की, 'कसोटी मालिकेत आम्हाला रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजा या फिरकी जोडीची चिंता आहे. दोघांची गोलंदाजी नेहमीच फलंदाजाना अडचणीत टाकणारी आहे. आम्ही मोहम्मद शमी, उमेश यादव आणि इशांत शर्मा यांना कसे खेळावे, याबद्दल प्लॅन आखला आहे. मात्र, अश्विन जडेजा जोडी आमच्यासाठी डोकेदुखी ठरु शकते. पण आम्ही या जोडीसमोर धैर्याने खेळू.'

मोहम्मद मिथून

सध्य स्थितीतील भारतीय संघ सर्वच आघाडीत मजबूत आहे. भारताचे पाचही गोलंदाज भेदक मारा करण्यासाठी उत्सुक असतात. यामुळे आम्ही प्रशिक्षकांच्या मदतीने डावपेच आखत असल्याचेही मिथून म्हणाला.

दरम्यान, भारत-बांगलादेश संघात दोन कसोटी सामन्याची मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना इंदूरमध्ये १४ ते १८ नोव्हेंबर दरम्यान तर दुसरा ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटी सामना कोलकाता येथे २२ ते २६ नोव्हेंबरदरम्यान खेळला जाणार आहे.

हेही वाचा -आता 'हा' भारतीय क्रिकेटर म्हणतोय, मी पुन्हा येईन...मी पुन्हा येईन...

हेही वाचा -हिटमॅनची 'ती' 'मॅरेथॉन' खेळी: एका जीवनदानानंतर ३३ चौकार व ९ षटकारांची आतिषी फटकेबाजी

ABOUT THE AUTHOR

...view details