महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

ऐतिहासिक डे-नाईट सामना : हाऊसफुल्ल..हाऊसफुल्ल...हाऊसफुल्ल....! - भारताचा पहिला दिवस-रात्र कसोटी सामना

भारत विरुध्द बांगलादेश संघात पहिला दिवस-रात्र कसोटी सामना २२ नोव्हेंबर पासून  कोलकाताच्या मैदानावर रंगणार आहे. हा ऐतिहासिक सामना पाहण्यासाठी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे. या सामन्यांचे साक्षीदार होण्यासाठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे.

ऐतिहासिक डे-नाईट सामना : हाऊसफुल्ल..हाऊसफुल्ल...हाऊसफुल्ल....!

By

Published : Nov 18, 2019, 8:43 PM IST

कोलकाता - भारतात पहिला दिवस-रात्र कसोटी सामन्याचे आयोजन करण्यात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष सौरव गांगुलीचा मोठा हात आहे. गांगुली कसोटी क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्नशील असून याच दृष्टीकोनातून त्याने पहिल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यासाठी पुढाकार घेतला. उल्लेखनीय बाब म्हणजे, या ऐतिहासिक कसोटी सामन्यासाठी ईडन गार्डन्स 'हाऊसफुल्ल' झाले आहे. याची माहिती गांगुलीने दिली.

भारत विरुध्द बांगलादेश संघात पहिला दिवस-रात्र कसोटी सामना २२ नोव्हेंबर पासून कोलकाताच्या मैदानावर रंगणार आहे. हा ऐतिहासिक सामना पाहण्यासाठी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे. या सामन्यांचे साक्षीदार होण्यासाठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे.

याविषयी बोलताना गांगुलीने सांगितलं की, 'दिवस-रात्र कसोटी सामन्याचे नियोजन करणे आव्हानात्मक आहे. पण या सामन्यासाठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. आपण भारत-पाक सामन्यादरम्यान संपूर्ण मैदान भरलेले पाहिले असेल. पण भारत-बांगलादेश संघातील ऐतिहासिक कसोटी सामन्याच्या पहिल्या ३ दिवसांची संपूर्ण ६५ हजार तिकिटे बुक झाली आहेत.'

कसोटी क्रिकेटमध्ये काही बदल करणे गरजेचे होते. हे बदल भारतामध्ये मला घडवायचे होते. आता ही गोष्ट मला शक्य झाली आहे. चाहत्यांनीही या प्रयोगाला दमदार प्रतिसाद दिला असल्याचे गांगुलीने सांगितलं.

हेही वाचा -Ind Vs Ban : विराटने घेतली स्पेशल फॅनची भेट, वाचा कोण आहे 'ती'

हेही वाचा -VIDEO : 'दो रुपये की पेप्सी, मुश्फीकुर रहिम सेक्सी'

ABOUT THE AUTHOR

...view details