राजकोट - भारत विरुध्द बांगलादेश संघात आज ३ सामन्यांच्या मालिकेतील दुसरा टी-२० सामना राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या मैदानावर रंगणार आहे. रविवारी दिल्लीच्या मैदानावर झालेल्या सामन्यात बांगलादेश संघाने विजय मिळवून मालिकेत १-० ने आघाडी घेतली. आज भारतीय संघ विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधण्याच्या प्रयत्नात आहे. भारतीय संघ विजयासाठी संपूर्ण ताकदीनिशी उतरेल. दरम्यान, या सामन्यात 'या' विक्रमांची नोंद होऊ शकते.
भारत विरुध्द बांगलादेश सामना : आज होऊ शकतात 'हे' विक्रम
आज भारतीय संघ विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधण्याच्या प्रयत्नात आहे. भारतीय संघ विजयासाठी संपूर्ण ताकदीनिशी उतरेल. दरम्यान, या सामन्यात 'या' विक्रमांची नोंद होऊ शकते.
भारत विरुध्द बांगलादेश सामना : आज होऊ शकतात 'हे' विक्रम
वाचा कोणते आहेत ते विक्रम -
- रोहित शर्माने बांगलादेशविरुध्दचा हा सामना खेळला तर तो त्याच्या कारकिर्दीतील १०० वा आंतरराष्ट्रीय टी-२० सामना ठरेल. पाकिस्तानचा शोएब मलिकनंतर रोहित १०० आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळणार दुसरा खेळाडू ठरणार आहे.
- श्रेय्यस अय्यरने या सामन्यात जर १० धावा केल्या तर तो २०१९ मध्ये टी-२० फॉरमॅटमध्ये १००० धावा पूर्ण करेल, असा पराक्रम करणारा तो भारताचा पहिला तर जगातील १४ वा फलंदाज ठरणार आहे.
- ऋषभ पंतला टी-२० क्रिकेटमध्ये ५० झेल पूर्ण करण्यासाठी १ झेलची गरज आहे. तो या सामन्यात एक झेल घेऊन ५० झेल पूर्ण करु शकतो.
- भारताचा सलामीवीर शिखर धवनचा हा १०० वा टी-२० सामना ठरणार आहे.
- वाशिंग्टन सुंदरला जर या सामन्यात संधी मिळाली तर त्याचा हा ५० वा टी-२० सामना ठरणार आहे.
- बांगलादेशचा मोसदेक हुसैनला टी-२० क्रिकेटमध्ये १००० धावा पूर्ण करण्यासाठी ५३ धावांची गरज आहे. तो या धावा या सामन्यात करुन आपल्या कारकिर्दीतील १००० धावा पूर्ण करु शकतो.
- बांगलादेशच्या महमदुल्लाहला टी-२० मध्ये ५० षटकार पूर्ण करण्यासाठी २ षटकारांची गरज आहे.
- महत्वाचे म्हणजे, भारतीय संघाने एकदाही बांगलादेश विरुध्द टी-२० मालिका गमावलेली नाही. जर आजचा सामना बांगलादेशने जिंकला तर भारतीय संघावर पहिल्यांदाच मालिका गमावण्याची वेळ येऊ शकते.
- युजवेंद्र चहलला आपल्या टी-२० कार्यकिर्दीतील ५० बळी पूर्ण करण्यासाठी ३ बळीची गरज आहे. जर त्याने या सामन्यात ३ बळी घेतल्यास तो भारताचा तिसरा गोलंदाज ठरेल. यापूर्वी आर. अश्विन (५२) आणि जसप्रीत बुमराह (५१) याने हा टप्पा पार केला आहे.
- केएल राहुलला टी-२० क्रिकेटमध्ये १००० धावा पूर्ण करण्यासाठी ८६ धावांची गरज आहे. जर त्याने या धावा केल्या तर तो भारताचा सातवा फलंदाज ठरेल.