महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IND vs AUS : भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यातील ५ खास विक्रम, वाचा एका क्लिकवर... - भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यातील खास विक्रम

भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारीत ५० षटकात ६ बाद ३४० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल ऑस्ट्रेलियाचा संघ सर्वबाद ३०४ धावा करु शकला. दरम्यान, या सामन्यात अनेक विक्रमांची नोंद झाली. वाचा यातील काही खास विक्रम...

India vs australia 2nd odi in rajkot : five big record
IND vs AUS : भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यातील खास विक्रम, एका क्लिकवर...

By

Published : Jan 18, 2020, 10:07 AM IST

राजकोट - मुंबईतील लाजिरवाण्या पराभवाचा बदला टीम इंडियाने राजकोटमध्ये घेतला. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला ३६ धावांनी धूळ चारत मालिकेत १-१ ने बरोबरी साधली. ऑस्ट्रेलियन कर्णधार अ‌ॅरोन फिंचने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. तेव्हा भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारीत ५० षटकात ६ बाद ३४० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल ऑस्ट्रेलियाचा संघ सर्वबाद ३०४ धावा करु शकला. दरम्यान, या सामन्यात अनेक विक्रमांची नोंद झाली. वाचा यातील ५ खास विक्रम...

भारत-ऑस्ट्रेलिया दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात झालेले विक्रम -

  • केएल राहुलने या सामन्यात ५२ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ८० धावांची खेळी केली. या धावसंख्येसह तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये जलद १००० धावा पूर्ण करणारा भारताचा तिसरा फलंदाज ठरला. त्याने हा कारनामा २७ सामन्यात केला. याआधी विराट आणि शिखर यांनी हा पराक्रम केला असून त्यांनी अनुक्रमे २४ आणि २५ सामन्यात जलद १००० धावा पूर्ण केल्या आहेत.
  • कुलदीप यादवने या सामन्यात १०० विकेट्सचा टप्पा पार केला. अ‌ॅलेक्स कॅरीला कुलदीपचा १०० वा बळी ठरला. असा कारनामा करणारा कुलदीप भारताचा २२ वा तर जगातील १५१ वा गोलंदाज ठरला.
    भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यातील एक क्षण...
  • ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू गोलंदाज अ‌ॅडम झंम्पाने या सामन्यात विराट कोहलीला बाद करत एका विक्रमाची नोंद केली. तो भारतात, भारताविरुद्ध खेळताना सर्वाधिक गडी बाद करणारा जगातील पहिला गोलंदाज ठरला. त्याने आतापर्यंत १० सामन्यात १९ गडी बाद केले आहेत.
  • रोहित शर्मानेही राजकोटच्या मैदानात आपल्या नावे एका विक्रमाची नोंद केली. १८ धावा पूर्ण करताच, रोहित सलामीवीर म्हणून सर्वात जलद ७००० धावा पूर्ण करणारा जगातील पहिला फलंदाज ठरला. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम आमला आणि भारताच्या सचिन तेंडुलकरला मागे टाकले.
  • याशिवाय, राजकोटच्या मैदानात भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिलाच एकदिवसीय सामना खेळवण्यात आला. यात भारताने विजय मिळवला.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details