महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Ind vs Eng ५th T२० : भारत-इंग्लंड यांच्यात आज निर्णायक मुकाबला - भारत वि. इंग्लंड अहमदाबाद टी-२० ड्रीम इलेव्हन

भारत आणि इंग्लंड यांच्यात आज अहमदाबादमध्ये पाचवा आणि निर्णायक सामना होत आहे. उभय संघातील मालिका २-२ ने बरोबरीत आहे.

India v England, 5th T20I: Preview
Ind vs Eng ५th T२० : भारत-इंग्लंड यांच्यात आज निर्णायक मुकाबला

By

Published : Mar 20, 2021, 2:57 PM IST

अहमदाबाद - भारतीय संघ आज नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणारा पाचवा टी-२० सामना जिंकून मालिकेवर ताबा मिळवण्याच्या उद्देशानं मैदानात उतरेल. भारताला पहिल्या सामन्यात पराभव पत्कारावा लागला. भारताने याची परतफेड दुसऱ्या सामन्यात विजय मिळवत केली. तिसरा सामना इंग्लंडने जिंकत मालिकेत आघाडी घेतली. तेव्हा चौथ्या सामन्यात दडपणाच्या स्थितीत भारताने इंग्लंडवर सरशी साधत मालिका २-२ बरोबरीत आणली.

उभय संघातील तीन सामने लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघांनी जिंकल्या आहेत. तर चौथा सामना भारताने लक्ष्याचा बचाव करताना जिंकला. या सामन्यात सूर्यकुमार यादवने अर्धशतक झळकावलं.

भारताने या मालिकेत मिळवलेल्या दोन विजयात फलंदाजांचे योगदान महत्वपूर्ण राहिले आहे. इशान किशनने दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावात संघाच्या विजयात मोलाची भूमिका निभावली होती. कर्णधार विराट कोहलीने देखील या सामन्यात नाबाद अर्धशतकी खेळी केली होती. चौथ्या सामन्यात सूर्यकुमार यादवने अर्धशतक झळकावले. दुसरीकडे भारताची गोलंदाज धावा रोखण्यात आणि विकेट घेण्यात संघर्ष करताना पाहायला मिळाले. भुवनेश्वरला झोकात पुनरागमन करता आलेले नाही. हार्दिक पांड्या, शार्दुल ठाकूर महागडे ठरले आहेत.

दुसरीकडे इंग्लंडचे गोलंदाज मोक्याच्या क्षणी विकेट घेण्यात आणि धावांवर लगाम लावण्यात यशस्वी ठरले आहेत. वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर व मार्क वुड यांनी छाप सोडली. फलंदाजीत इंग्लंड संघाला जोस बटलर व जागतिक क्रमवारीतील अव्वल फलंदाज डेव्हिन मलान यांच्याकडून कामगिरीत सातत्य अपेक्षित आहे.

भारतीय संघ -

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, नवदीप सैनी, दीपक चहर, राहुल चहर, राहुल तेवतिया आणि ईशान किशन.

इंग्लंडचा संघ -

इयॉन मोर्गन (कर्णधार), जोस बटलर, जेसन रॉय, लियाम लिविंगस्टोन, डेव्हिन मलान, बेन स्टोक्स, मोइन अली, आदिल राशिद, रीस टॉपले, ख्रिस जॉर्डन, मार्क वुड, सॅम करन, टॉम करन, सॅम बिलिंग्स, जॉनी बेयरस्टो आणि जोफ्रा आर्चर.

हेही वाचा -टी-२०त रोहित ९ हजारी मनसबदार; 'या' खेळाडूंनी केला कारनामा

हेही वाचा -Ind vs Eng ४th t-२० : भारताची मालिकेत बरोबरी; इंग्लंडवर मिळवला निसटता विजय

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details