महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

टीम इंडियाचा न्यूझीलंड दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक... - न्यूझीलंड दौऱ्याचे वेळापत्रक

न्यूझीलंड दौऱ्यात भारतीय संघ ५ टी-२०, ३ एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. वाचा असे आहे, भारताच्या न्यूझीलंड दौऱ्याचे वेळापत्रक....

india tour of new zealand 2020 full schedule
टीम इंडियाचा न्यूझीलंड दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक...

By

Published : Jan 13, 2020, 11:54 AM IST

नवी दिल्ली - न्यूझीलंड दौऱ्यातील टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा रविवारी रात्री उशिरा करण्यात आली. या संघात सलामीवीर रोहित शर्माचे संघात पुनरागमन झाले आहे. तर यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनला वगळण्यात आले आहे. दरम्यान, न्यूझीलंड दौऱ्यात भारतीय संघ ५ टी-२०, ३ एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. वाचा असे आहे, भारताच्या न्यूझीलंड दौऱ्याचे वेळापत्रक....

असा आहे न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ -
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), लोकेश राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, रविंद्र जाडेजा आणि शार्दुल ठाकूर.

भारतीय संघाचा न्यूझीलंड दौरा -

५ सामन्यांची टी-२० मालिका

  • पहिली टी-२० - ऑकलंड - २४ जानेवारी
  • दुसरी टी-२० - ऑकलंड - २६ जानेवारी
  • तिसरी टी-२० - हॅमिल्टन - २९ जानेवारी
  • चौथी टी-२० - वेलिंग्टन - ३१ जानेवारी
  • पाचवी टी-२० - माऊंट माउंगानुई - ०२ फेब्रुवारी

३ सामन्यांची एकदिवसीय मालिका -

  • पहिला एकदिवसीय सामना - हॅमिल्टन - ०५ फेब्रुवारी
  • दुसरा एकदिवसीय सामना - ऑकलंड - ०८ फेब्रुवारी
  • तिसरा एकदिवसीय सामना - माऊंट माउंगानुई- ११ फेब्रुवारी

न्यूझीलंड अ संघाविरुद्ध ३ दिवसाचा सराव सामना - हॅमिल्टन - १४ ते १६ फेब्रुवारी

२ सामन्यांची कसोटी मालिका -

  • पहिली कसोटी - २१ ते २५ फेब्रुवारी - वेलिंग्टन
  • दुसरी कसोटी - २९ फेब्रुवारी ते ०४ मार्च - ख्राइस्टचर्च

ABOUT THE AUTHOR

...view details