दुबई - भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना झाला आहे. बीसीसीआयने खेळाडू रवाना होतानाचे फोटो आपल्या ट्विटर अकाउंटवरुन शेअर केले आहेत. दरम्यान, उभय संघातील दौऱ्याला २७ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. यात उपकर्णधार रोहित शर्माचे नाव वगळण्यात आले होते. यावरुन विविध चर्चांना ऊत आला होता. त्यानंतर बीसीसीआयने आणखी एक बैठक घेत संघात काही बदल केले. यात त्यांनी रोहितला कसोटी संघात स्थान दिले.
दुखापतीमुळे रोहित भारतात परतणार...
रोहित शर्मा आपल्या कुटुंबासमवेत युएईमध्ये आहे. तिथून तो पुन्हा भारतात दाखल होणार आहे. इथे तो आपल्या दुखापतीतून पूर्णपणे तंदुरूस्त होण्यासाठी विश्रांती घेणार आहे. बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये तो काही काळ सराव करणार आहे. त्यानंतर फिटनेस चाचणी पार केल्यावर तो कसोटी मालिकेआधी ऑस्ट्रेलियाला रवाना होऊन संघात दाखल होणार आहे.
भारताचा सुधारित संघ -
- टी-20 - विराट कोहली, शिखर धवन, मयांक अग्रवाल, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांडे, संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चहर, टी नटराजन
- एकदिवसीय संघ - विराट कोहली, शिखर धवन, शुबमन गिल, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयांक अग्रवाल, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर, संजू सॅमसन
- कसोटी संघ - विराट कोहली, रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, पृथ्वी शॉ, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, शुबमन गिल, वृद्धीमान साहा, रिषभ पंत, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, आर अश्विन, मोहम्मद सिराज
हेही वाचा -टीम इंडियाविरुद्धच्या टी-२० मालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ दिसणार नव्या जर्सीत
हेही वाचा -IPL 2020 : मुंबईच्या पाचव्या विजेतेपदाबाबत सचिन म्हणाला, अफलातून विजय....