नवी दिल्ली - भारतीय संघ या वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया डे-नाईट कसोटी सामना खेळणार असल्याचं बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी जाहीर केलं आहे.
गांगुलीने सांगितलं की, 'भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्याच देशात डे-नाईट कसोटी सामना खेळणार आहे. लवकरच या सामन्याचे ठिकाण ठरवले जाईल. तसेच आगामी प्रत्येक कसोटी मालिकेत किमान एक सामना डे-नाईट खेळवण्याचा विचार बीसीसीआय करत आहे.'
दरम्यान काही दिवसापूर्वी भारतीय कर्णधार विराट कोहलीने ऑस्ट्रेलियातील कोणत्याही स्टेडियमवर डे-नाईट कसोटी खेळण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असे म्हटले होते.
भारतीय संघाने याआधी अनुभवाचे कारण देत २०१८-१९ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात डे-नाईट कसोटी सामना खेळण्यास नकार दिला होता. यानंतर ऑस्ट्रेलियाच्या अनेक माजी क्रिकेटपटूंसह ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळानेसुद्धा भारताला आगामी दौऱ्यात डे-नाईट कसोटी खेळण्याची विनंती केली. यावर बीसीसीआयने सहमती दर्शवली आहे. भारतीय संघ ऑक्टोबर ते जानेवारीदरम्यान ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे.
भारताचा पहिला डे-नाईट कसोटी सामना -