नवी दिल्ली - आज भारताने चांद्रयान-2 चे यशस्वी उड्डाण करून अवकाश संशोधनात इतिहास घडवला. दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून GSLV मार्क-3 च्या मदतीने चांद्रयान-2 अवकाशात सोडण्यात आले. 54 दिवसाने हे यान चंद्रावर पोहोचणार आहे. या उड्डाणाबद्दल इस्रोचे जरभरातून कौतूक होत आहे. भारताच्या क्रिकेटपटूंनीही इस्रोवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
चांद्रयान-2 च्या यशस्वी उड्डाणाबद्दल 'या' खेळाडूंनी केला इस्रोवर अभिनंदनाचा वर्षाव - cheteshwar pujara
इस्रोच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल वीरेंद्र सेहवाग, विराट कोहली, सुरेश रैना आणि अन्य खेळाडूंनी कौतूक केले आहे.
भारताच्या या महत्वाकांक्षी मोहिमेकडे संपूर्ण देशाचेच नव्हे तर जगाचे लक्ष लागून राहिले होते. त्याला कारण म्हणजे भारताचे हे चांद्रयान 2 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर म्हणजेच ज्या ठिकाणी सूर्याची किरणे पोहोचत नाहीत त्या भागामध्ये उतरणार आहे. विशेष म्हणजे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा म्हणजेच अलगद उतरणाऱ्या देशांमध्ये भारताचा चौथा नंबर लागणार आहे. चंद्रावरील दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरणार आहे. भारताच्या या कामगिरीनंतर आपण संपूर्ण जगाला मार्गदशक असणार आहोत. इस्रोच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल वीरेंद्र सेहवाग, विराट कोहली, सुरेश रैना आणि अन्य खेळाडूंनी कौतूक केले आहे.