हैदराबाद -भारतीय संघाचा फिरकीपटू यूजवेंद्र चहलने नृत्यदिग्दर्शक आणि यूट्यूब स्टार धनाश्री वर्मा हिच्यासोबत साखरपुडा केला आहे. चहलने शनिवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली. ''आम्ही हो म्हणालो आहोत आणि आमच्या कुटुंबीयांनीही होकार दिला आहे. साखरपुडा सोहळा'', असे चहलने शेअर केलेल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
भारताचा फलंदाज लोकेश राहुलने चहलचे अभिनंदन केले आहे. "दोघांचे अभिनंदन", असे त्याने म्हटले आहे. आयपीएल संघ चेन्नई सुपर किंग्जनेही (सीएसके) चहलचे अभिनंदन केले आहे. "दोघांचे अभिनंदन. किंग्जकडून युजीला वैयक्तिक सल्ला - नेहमीच राणी (राणी)समोर नतमस्तक व्हा अन्यथा तुमचा पराभव होईल", असे सीएसकेने मिश्किलपणे म्हटले आहे.