महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 11, 2019, 4:39 PM IST

Updated : Sep 11, 2019, 5:20 PM IST

ETV Bharat / sports

पाकिस्तान खोटारडा... भारतावर आरोप करणाऱ्या पाकला श्रीलंकेचे खडेबोल

पाकिस्तानने केलेल्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही. भारताकडून श्रीलंकेच्या खेळाडूंवर कोणताही दबाव टाकण्यात आलेला नाही. २००९ च्या घटनेच्या पार्श्वभूमीवर काही खेळाडूंनी पाकिस्तानच्या दौऱ्यावर न जाण्याचा निर्णय घेतला आहे. खेळाडूंच्या भावनांचा सन्मान करुन आम्ही त्यांना संघात सामिल केले नाही. आमचा संघ पाकिस्तानमध्ये जाऊनच पाकिस्तानी संघाचा पराभव करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे, असे फर्नांडो म्हणाले.

पाकिस्तान खोडारडा... भारतावर आरोप करणाऱ्या पाकला श्रीलंकेचे खडेबोल

कोलंबो - पाकिस्तान दौऱ्यावर जाऊ नका असे भारताकडून श्रीलंकन खेळाडूंना सांगितले जात आहे, असा गंभीर आरोप पाकिस्तानचे मंत्री फवाद हुसेन चौधरी यांनी केला होता. यावर श्रीलंकेचे क्रीडामंत्री हरिन फर्नांडो यांनी पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड करत श्रीलंकन खेळाडूंवर भारताचा कोणताही दबाव नसल्याचे स्पष्ट केले आहे.

सप्टेंबरमध्ये सुरू होणाऱ्या दौऱ्यासाठी श्रीलंकेच्या १० खेळाडूंना पाकिस्तानला जाण्यास नकार दिला. यामुळे या दौऱ्याबाबत अनिश्चततता निर्माण झाली. तेव्हा भडकलेल्या पाकिस्तानी मंत्र्यांने याचे खापर भारतावर फोडले आणि पाकिस्तान दौऱ्यावर जाऊ नका असे भारताकडून श्रीलंकन खेळाडूंना सांगितले जात आहे. तुम्ही पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेतली नाहीत, तर तुमची आयपीएलमधून हकालपट्टी केली जाईल, असे भारताकडून त्या खेळाडूंना धमकावण्यात आले असल्याचा गंभीर आरोप केला.

हेही वाचा -स्टिव्ह स्मिथ 'सुपरफास्ट'...विराटसाठी कसोटीत अव्वल स्थान कठीण

यावर श्रीलंकेच्या क्रीडामंत्री हरिन फर्नांडो यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानने केलेल्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही. भारताकडून श्रीलंकेच्या खेळाडूंवर कोणताही दबाव टाकण्यात आलेला नाही. २००९ च्या घटनेच्या पार्श्वभूमीवर काही खेळाडूंनी पाकिस्तानच्या दौऱ्यावर न जाण्याचा निर्णय घेतला आहे. खेळाडूंच्या भावनांचा सन्मान करुन आम्ही त्यांना संघात सामिल केले नाही. आमचा संघ पाकिस्तानमध्ये जाऊनच पाकिस्तानी संघाचा पराभव करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे, असे फर्नांडो म्हणाले.

हेही वाचा -'या' कारणामुळे कुलदीप, चहलला आफ्रिकेविरुध्दच्या मालिकेतून वगळले - प्रसाद

दरम्यान, टी-२० कर्णधार लसिथ मलिंगा, माजी कर्णधार अँजलो मॅथ्यूज, निरोशन डिकवेला, कुसल परेरा, धनंजय डी सिल्वा, अकिला धनंजय, सुरंगा लकमल आणि दिनेश चंडीमल या खेळाडूंनी पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेतली आहे. २००९ मध्ये श्रीलंकेच्या खेळाडूंवर पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. या दहशतवादी हल्ल्यानंतर झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजच्या संघांशिवाय कोणत्याही संघांनी पाकिस्तानचा दौरा केला नाही.

Last Updated : Sep 11, 2019, 5:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details