हैदराबाद - न्यूझीलंडचा संघ सुपर ओव्हर खेळवण्यात आलेल्या सामन्यात आजघडीपर्यंत ७ पैकी तब्बल ६ वेळा पराभूत झाला आहे. आज (बुधवार) भारतीय संघाने न्यूझीलंडला सुपर ओव्हरमध्ये मात दिली. दोनही संघांनी निर्धारीत २० षटकात समान १७९-१७९ धावा केल्या. यामुळे सुपर ओव्हर खेळवण्यात आली. न्यूझीलंडने सुपर ओव्हरमध्ये १७ धावा केल्या. भारतीय रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी संघाला विजय मिळवून दिला. शेवटच्या दोन चेंडूवर १० धावांची गरज असताना रोहित शर्माने सलग दोन षटकार खेचले. पराभवानंतर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सने सुपर ओव्हर आमच्यासाठी अशुभ आहे. यामुळे आम्हाला मुख्य सामन्यातच चांगली कामगिरी करावी लागणार असल्याची प्रतिक्रिया दिली.
न्यूझीलंडने आजघडीपर्यंत ७ वेळा सुपर ओव्हरमध्ये सामना खेळला आहे. यात एकच सामना न्यूझीलंडला जिंकता आला आहे. राहिलेले ६ सामन्यात किवींना पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. दरम्यान, इंग्लंडमध्ये झालेल्या एकदिवसीय विश्व करंडक स्पर्धेचा अंतिम सामनाही सुपर ओव्हरमध्ये गेला होता. न्यूझीलंड-इंग्लंड यांच्यातील सामन्यात सुपर ओव्हर खेळवण्यात आली. सुपर ओव्हरमध्येही दोनही संघांनी समान धावा केल्या. तेव्हा चौकाराच्या निकषाच्या जोरावर इंग्लंडला विजेता ठरवण्यात आले.
आजघडीपर्यंत न्यूझीलंडने खेळलेले सुपर ओव्हरचे सामने -
सामना | विरोधी संघ | सन | ठिकाण | निकाल |
टी-२० | भारत | २०२० | हॅमिल्टन | पराभव |
टी-२० | इंग्लंड | २०१९ | ऑकलंड | पराभव |
एकदिवसीय | इंग्लंड | २०१९ | लॉर्डस् | पराभव |
टी-२० | वेस्ट इंडीज | २०१२ | पल्लेकेले | पराभव |
टी-२० | श्रीलंका | २०१२ | पल्लेकेले | पराभव |
टी-२० | ऑस्ट्रेलिया | २०१० | क्राइस्टचर्च | विजय |
टी-२० | वेस्ट इंडीज | २००८ | ऑकलंड | पराभव |