मेलबर्न - भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात ऑस्ट्रेलियन मिचेल स्टार्क, जेम्स पॅटिन्सन, जोस हेजलवूड यासारख्या एकापेक्षा एक वेगवान गोलंदाजांचा सामना भारतीय फलंदाजांना करावयाचा आहे. यासाठी भारतीय संघाने सरावाला सुरुवात केली आहे. त्यासाठी एक खास टेक्निक वापरत टीम इंडिया सराव करत आहे.
ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्या वेगवान गोलंदाजांना साथ देणाऱ्या असतात. या खेळपट्ट्यावर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या उसळत्या चेंडूंचा सामना भारतीय फलंदाजांना करावा लागणार आहे. यामुळे भारतीय संघाकडून खास टेक्निक वापरत सराव केला जात आहे. यात अश्विन टेनिस रॅकेटच्या मदतीने चेंडू टोलावत फलंदाजांकडून सराव करून घेताना पाहायला मिळत आहे.
उभय संघात ३ एकदिवसीय, ३ टी-२० आणि ४ कसोटी सामन्याची मालिका खेळवण्यात येणार आहे. या दौऱ्याला २७ नोव्हेंबरपासून सुरूवात होणार आहे.
भारताचा सुधारित संघ -
- टी-२० - विराट कोहली, शिखर धवन, मयांक अग्रवाल, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांडे, संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चहर, टी नटराजन
- एकदिवसीय संघ - विराट कोहली, शिखर धवन, शुबमन गिल, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयांक अग्रवाल, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर, संजू सॅमसन
- कसोटी संघ - विराट कोहली, रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, पृथ्वी शॉ, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, शुबमन गिल, वृद्धीमान साहा, रिषभ पंत, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, आर अश्विन, मोहम्मद सिराज
असा आहे भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा –
- पहिला एकदिवसीय सामना – २७ नोव्हेंबर – सिडनी
- दुसरा एकदिवसीय सामना – २९ नोव्हेंबर – सिडनी
- तिसरा एकदिवसीय सामना – १ डिसेंबर – ओव्हल
- पहिला टी-२० सामना – ४ डिसेंबर – ओव्हल
- दुसरा टी-२० सामना – ६ डिसेंबर – सिडनी
- तिसरा टी-२० सामना – ८ डिसेंबर – सिडनी
- पहिला कसोटी सामना – १७ ते २१ डिसेंबर – अॅडलेड (दिवस-रात्र)
- दुसरा कसोटी सामना – २६ ते ३० डिसेंबर – मेलबर्न
- तिसरा कसोटी सामना – ७ ते ११ जानेवारी – सिडनी
- चौथा कसोटी सामना – १५ ते १९ जानेवारी – गाबा
हेही वाचा -'...त्यावेळी बुमराह क्रिकेटच्या सर्व प्रकारात भारताचा महान वेगवान गोलंदाज म्हणून ओळखला जाईल'
हेही वाचा -Video : सामन्यादरम्यान पाकिस्तानी खेळाडूला आली 'लघुशंका'; फलंदाजी सोडून पळाला टॉयलेटच्या दिशेने