गयाना -वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेत टीम इंडियाने निर्भेळ यश संपादन केले आहे. ही मालिका ३-० ने खिशात घातल्यानंतर, विराटने आगामी विश्वकरंडक स्पर्धेबाबत आपले विचार मांडले आहेत. टीम इंडिया २०२३ च्या विश्वकरंडक स्पर्धेबाबत विचार करत नसल्याचे विराटने म्हटले आहे.
विराट म्हणतो, 'आम्ही पुढच्या विश्वकरंडक स्पर्धेचा विचार करत नाही.' - एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धा
२०२३ ची एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धा भारतात होणार आहे.
२०२३ ची एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धा भारतात होणार आहे. त्यामुळे आमचे पूर्ण लक्ष सतत चांगले प्रदर्शन करण्यावर असणार आहे, असे कोहलीने म्हटले. तो म्हणाला, '२०२३ च्या विश्वकरंडक स्पर्धेचा विचार करणे ही खूप लांबची गोष्ट आहे. आमची प्राथमिकता नेहमी सतत चांगले प्रदर्शन करण्याची असणार आहे. मागच्या तीन-चार वर्षांपासून असे केल्याने आम्ही यशस्वी ठरलो आहोत. आम्ही जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहोत. कधी- कधी आम्ही अव्वल स्थानही गाठले आहे.'
कोहली पुढे म्हणाला, 'वास्तवात, तुम्ही १२ महिने अगोदर विश्वकरंडक स्पर्धेची तयारी सुरु करता. सतत क्रिकेट खेळून टीम इंडियाला अव्वल ठेवणे हीच आमची प्राथमिकता आहे. त्यामुळेच आमचा संघ जगातील चांगल्या संघांपैकी एक आहे.' वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या शेवटच्या टी-२० सामन्यात ऋषभ पंतने चांगले प्रदर्शन केले होते. कोहलीने पंतचेही कौतूक केले आहे. पंतच्या खेळीमुळे भारताला सात विकेट राखून हा सामना जिंकता आला होता.