लंडन -इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन आपल्या ट्विटर अकाउंटवरून नेहमी मते मांडत असतो. भारत दौऱ्यावर आलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची देखील वॉनने फिरकी घेतली होती. आता त्याने न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाबद्दल महत्वाचे विधान केले आहे.
हेही वाचा -
'चेंडू हवेत वळणाऱ्या खेळपट्टीवर कसे खेळावे याचा धडा न्यूझीलंड संघाने भारताला शिकवला आहे. जोपर्यंत न्यूझीलंड किंवा इंग्लंडसारख्या देशात जिंकत नाही तोपर्यंत भारतीय संघाला 'महान' म्हटले जाणार नाही', असे मत मायकेल वॉनने ट्विटच्या माध्यमातून मांडले आहे.
विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळत असलेली टीम इंडिया सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेत यजमान संघाने भारताला व्हाईटवॉश दिला. तर, कसोटीत मालिकेच्या पहिल्या सामन्यातही भारताला सहज मात दिली. ख्राईस्टचर्च येथे उभय संघात सुरू असलेल्या दुसऱया कसोटीतही भारताची अवस्था बिकट झाली आहे. याच प्रश्नावर वॉनने बोट ठेवले.