बेळगाव - भारत 'अ' आणि श्रीलंका 'अ' संघात खेळण्यात येत असलेल्या ५ सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारत 'अ' संघाने १० विकेट राखून विजय मिळवलाय. या विजयासह भारताने वनडे मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. यापूर्वी झालेल्या पहिल्या वनडेत भारताने ४८ धावांनी विजय मिळवला होता.
या सामन्यात भारत 'अ' संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. श्रीलंकेच्या संघावे निर्धारीत ५० षटकामध्ये ७ विकेट गमावत २४२ धावा करत्या आल्या. श्रीलंकेने विजयासाठी दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने ३३.३ षटकांमध्ये बिनबाद विजय साजरा केला. भारताचे सलामीवीर ऋतुराज गायकवाडने १२५ तर शुभमन गिलने १०९ धावांची शतकी खेळी करत संघाला १० विकेटने दणदणीत विजय मिळवून दिला.